देऊळगाव राजा येथे ७९ वा होमगार्ड वर्धापन दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या आदेशानुसार तथा केंद्रप्रमुख पर्याय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड पथक देऊळगावराजा कार्यालयामध्ये ७९ वा वर्धापन दिन 13 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
होमगार्ड कार्यालय पथक देऊळगाव राजा मार्फत होमगार्ड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस स्टेशन व होमगार्ड कार्यालय देऊळगाव राजा परिसरामध्ये स्वच्छता मोहीम वृक्षारोपण करण्यात आले.पथकातील होमगार्ड सैनिक कांची कार्यक्षमता व तयारी पाहण्यात आली.तसेच मुख्य कार्यक्रमाचे परेड संचालन घेण्यात आले. ध्वजारोहण तालुका समादेशक ॲड रामेश्वर रामाने यांच्या हस्ते करण्यात आले. देऊळगाव राजा शहरांमध्ये होमगार्ड कार्यालयापासून शहरातील मुख्य मार्गावरून पथ संचलन करण्यात आले.
79 वा वर्धापन दिना निमित्त होमगार्ड कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी ॲड . रामेश्वर रामाने हे होते.प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी,सामाजिक कार्यकर्ते डॉ .रामप्रसाद शेळके,विष्णू रामाने,अशोक दादा पाटील हे उपस्थित होते.सदर कार्यक्रमांमध्ये सेवानिवृत्त होमगार्ड मधुकर चव्हाण व संतोष सानप यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.गायिका प्रीत पाटील व निलेश गोडे यांनी देशभक्ती पर गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला .याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत होमगार्ड दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
होमगार्ड वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका समादेशक ॲड रामेश्वर रामाने ,फलटण नायक जोगदंड, अंकुश झिने, अशोक सानप, नारायण खांडेभराड, सुनील झिने, गोपीनाथ जाधव ,होमगार्ड पंडित सोळंकी,ज्ञानेश्वर जायभाये,समाधान खार्डे,कैलास वाघ,संजय पवार, महिला होमगार्ड वडतकर मॅडम, मीना खरात,दिपाली मोरे, अनिता हनवते, सविता देशमुख,रंजना गायकवाड, शीला बनसोडे, तसेच कृष्णा वाघ,विनोद खंडागळे, गणेश खंडारे, मनोज वाघमारे,शिवाजी कुडके तथा सर्व महिला व पुरुष होमगार्ड सैनिक आदींनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुरज गुप्ता यांनी केले तर आभार प्रदर्शन होमगार्ड इंगळे यांनी केले



