ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहतूक शाखेतील अंमलदार यांना शासकीय डॉक्टरा कडून देण्यात आले प्रथमोपचाराचे प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि 28/01/26 रोजी 11/00 वा मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांच्या संकल्पनेतून प्रथमउपचार कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते. वाहतूक नियंत्रण शाखेचे अंमलदार नेहमीच रोडवर ड्युटी करीत असतात व रोडवर होणारे अपघात ठिकाणी त्यांना माहिती मिळालेवर पोहचत ही असतात अपघात स्थळी पोहचलेवर जखमी व्यक्तीचे प्राण वाचविणेस डायल 108 वर कॉल केलेवर घटनास्थळी अंबुलेन्स येई पर्यत जखमीतास वैद्यकीय मदत मिळे पर्यंत हजर असलेले वाहतूक पोलिसांनी अपघातात जखमीतावर प्रथमोपचार करून त्याचा प्राण कसां वाचेल, यासाठी काय काय पाहणी करावी काय कार्यवाही करावी काय दक्षता घ्यावी याचे मार्गदर्शन सह त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी सर्वांना प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविले ज्यात जखमीतास अगोदर रोडचे बाजूला हलवीताना 3/4 इसमानी एकत्र सोबत सारखे उचलावे, मान डोके सुरक्षित पणे आधार द्यावे, रक्तस्ट्राव कमी होणेस बेंडेज पट्टीने जखमच्या वरील बाजूस दाब दयावे, जखमी चे श्वासोश्वास चालू आहे कि नाही खात्री करावे, तो बोलत असेल तर त्यास धीर द्यावे, त्याला मानसिक शारीरिक आधार द्यावा, अंबुलेन्स ला कॉल करून घटनास्थळी बोलावून घ्यावे, तसेच शासनाने नवीन लौच केलेले **Good samaritan एप** मध्ये अपघात स्थळ चे फोटो व्हिडीओ ही अपलोड केल्यास ही जवळून शासकीय मदत आपणास मिळू शेकते,

अपघातांनतर जखमीतास

**गोल्डन हवर्स ** मध्ये जखमीतास लवकर उपचार मिलनेकरिता शासकीय / खाजगी जवळ असलेल्या दवाखान्यात भरती करावे, डॉक्टर व पोलीस यांनी ही जास्त चौकशी वगैरे न करता अगोदर दवाखान्यात नेऊन जखमी वर उपचार करावे, जखमी व्यक्तीस सामान्य व्यक्ती ही उपचारासाठी दवाखान्यात भरती करू शेकतो, जे व्यक्ती जखमीतास उपचार करिता लवकर भरती करेल त्या व्यक्तीस शासकीय **राहवीर योजना** अतर्गत 25000 रुपये बक्षीस शासनाने जाहीर केलेले आहे, तसेच जि एखादी संस्था/ टीम अपघाती व्यक्तीस उपचार करिता दवाखान्यात भरती करून त्यांचे प्राण वाचवतील त्यांना ही 1.50000/. रुपयांचे बक्षीस शासनाने जाहीर केलेले आहे,

प्रथमउपचार दरम्यान श्वास चालू नसेल तर CPR पद्धतीने त्यास श्वासोश्वास कृत्रिम रीतीने देवून त्याच्या हृदय फुफफूस मध्ये श्वास भरावे याबाबतचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिकारी श्री, डॉ,श्रद्धा पटेल डॉ,योगेश चांदुरकर

डॉ. प्रणय तड्स CPR इमरजेन्सी मॅनेजमेंट सेवाग्राम हॉस्पिटल तसेच डॉ सुबोधकुमार डॉ पवन भगत जिल्हा शासकीय रुग्णालंय वर्धा यांनी ही डायल 108 अंबुलेन्स चे कामकाज पद्धती व उपचार पद्धती बाबत प्रात्यक्षिक वाहतूक पोलिसांनl करून दाखविले,

सदर कार्यक्रम मध्ये सर्व वाहतूक शाखेतील अंमलदार पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोउपनि अमोल लगड, ASI रियाज खान, दिलीप कामडी, संजय भांडेकर, मुन्ना तिवारी किशोर पाटील यांनी परिश्रम घेतले

पो नि. विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये