ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरसीईआरटी चंद्रपूरमध्ये ‘Python, Data Science व AI’ करिअर संधींवर मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट

 राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज (RCERT) चंद्रपूर येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी “Python, Data Science and AI Career Opportunities” या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. ए. झेड. चिताडे, आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. आर. के. धात्रक यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मयूर लांडे, संस्थापक – AIverse IT & AI Training Institute उपस्थित होते. त्यांनी विविध उद्योगांमध्ये सुरू असलेल्या नव्या तांत्रिक ट्रेंड्स तसेच Python, Data Science आणि Artificial Intelligence या क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय डेटा संकलन, डेटा हाताळणी व आधुनिक सॉफ्टवेअर टूल्सच्या सहाय्याने डेटा विश्लेषण करण्याच्या विविध पद्धतींबाबतही त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रभारी विभागप्रमुख प्रा. डी. बी. मेश्राम यांनी कार्यक्रमाची माहिती देत सध्याच्या तांत्रिक युगात Artificial Intelligence आणि Data Science यांचे वाढते महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वयक डॉ. सुमित पुनम यांनी केले. तर प्रा. सुयोग धोके यांनी आभार प्रदर्शन केले. या सेमिनारचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांनी घेतला.

 तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये