ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव समाविष्ट करण्याची पुन्हा संधी

पात्र मतदारांनी गणना प्रपत्र व आवश्यक निवेदन सादर करावे – जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट

 प्रारूप मतदार यादीत नाव नाही? घाबरू नका, पुन्हा संधी मिळाली!

चंद्रपूर :_ विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) मध्ये अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार म्हणून नोंद झाल्यामुळे ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीत आली नाहीत, अशा पात्र मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा संधी दिली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी *वसुमना पंत* यांनी सर्व पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

*काय करावे लागेल?*

निवडणूक आयोगाच्या 6 नोव्हेंबर 2026 च्या निर्देशानुसार, अशा मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी पुन्हा प्रसिद्ध होणार आहे. ही यादी मतदान केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका / महानगरपालिका कार्यालय आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

*1. जुन्याच पत्त्यावर राहत असाल तर:*

भरलेले गणना प्रपत्र + *परिशिष्ट-B* मधील निवेदन द्या. यात आधी फॉर्म का भरला नाही, याचे कारण लिहावे लागेल.

*2. जिल्ह्यात / राज्यात स्थलांतर केले असेल तर:*

नवीन पत्ता + विधानसभा मतदारसंघाचा तपशील + *परिशिष्ट-C* मधील निवेदन + नवीन पत्त्याचा पुरावा द्या. यासाठी वेगळा Form-8 भरायची गरज नाही.

*फॉर्म कुठे मिळेल? कुठे जमा करायचा?*

– जुना EPIC नंबर वापरून आयोगाच्या संकेतस्थळावरून किंवा *ECINET App* वरून गणना प्रपत्र डाउनलोड करा.

– भरलेला फॉर्म *ERO / AERO / BLO* यांच्याकडे जमा करा.

– BLO शी बोलण्यासाठी *’Book a Call with BLO’* सुविधा उपलब्ध आहे.

*ज्यांनी आधीच Form-6 भरला आहे, त्यांना पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही.*

BLO मार्फत मतदारांशी संपर्क साधून मार्गदर्शन केले जाणार आहे. तपासणीनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट होतील.

    “कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये. आपले नाव यादीत आहे की नाही, हे आधी तपासा.” – *जिल्हाधिकारी वसुमना पंत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये