वनविभागाच्या एकजुटीतून चारगाव नदीवर वनराई बंधारा
सावली वनपरिक्षेत्रात १५ दिवसांत १०० वनराई बंधाऱ्यांची उभारणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
पाचही उपक्षेत्रांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सावली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या वतीने व्यापक जलसंधारण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी चारगाव नदीवर वाळूच्या पोत्यांच्या सहाय्याने मोठा वनराई बंधारा उभारण्यात आला. मा. श्री राजन तलमले, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर व श्री विकास तरसे, सहाय्यक वनसंरक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. नदीपात्रात उभारलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवून स्थानिक पातळीवर पाणीसाठा निर्माण होण्यास मदत होणार आहे. या पाण्याचा उपयोग वन्यप्राणी व पक्ष्यांना पिण्यासाठी होण्याबरोबरच परिसरातील जलसंधारण व भूजल पुनर्भरणालाही हातभार लागू शकतो.
वनक्षेत्रात पाण्याची उपलब्धता वाढल्यास वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी मिळण्यास मदत होऊन मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या प्रयत्नांनाही बळ मिळू शकते. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सावली वनपरिक्षेत्रातील प्रत्येक बीटामध्ये किमान पाच वनराई बंधारे उभारण्याच्या उद्दिष्टानुसार मागील १५ दिवसांत संपूर्ण वनपरिक्षेत्रात एकूण १०० वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. या कामांमुळे पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे आणि वनक्षेत्रातील पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. चारगाव नदीवरील बंधारा उभारणीच्या कामात सावली, पेंढरी, पाथरी, व्याहाड व राजोली या पाचही उपक्षेत्रांतील क्षेत्र सहाय्यक, वनपाल, वनरक्षक, बीट मदतनीस, PRT पथक व वनमजूर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून हे काम पूर्ण करण्यात आले. उपक्षेत्रनिहाय सहभागी अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे : उपक्षेत्र सावली : श्री एन. एल. सिडाम, क्षेत्र सहाय्यक सावली; श्री एम. व्ही. मुंडे, वनरक्षक सादागड; कु. ए. ए. गित्ते, वनरक्षक टेकाडी; श्री आर. आर. मुरकुटे, वनरक्षक चकपरंजी; रोशन मडावी, दिनेश मडावी, नवनीत जराते, पुणेश्वर भोयर, PRT राकेश गुंडावार, नागेश बद्दमवार, राकेश घोटेकर, शुभम देशमुख, अनिकेत जराते, अभिषेक भोयर, नितीन भोयर, वैभव गोहणे, समीर गोहणे व रितेश गोहणे. उपक्षेत्र पेंढरी : श्री ए. एन. मेश्राम, वनपाल; श्री डी. एल. गुरनुले, वनरक्षक पेंढरी; श्री आखाडे, वनरक्षक चारगाव; मिथुन पेंदाम, बीट मदतनीस पेंढरी; नागनाथ नर्मलवार, बीट मदतनीस चारगाव; विनोद जेंगठे, बीट मदतनीस मुंडाळा तसेच चारगाव PRT पथक. उपक्षेत्र पाथरी : श्री एम. जे. मस्के, क्षेत्र सहाय्यक; श्री एस. टी. चुधरी, वनरक्षक पालेबारसा; श्री एम. पी. इंगले, वनरक्षक गेवरा; श्री के. पी. मुनघाटे, वनरक्षक पाथरी; द्रोणाचार्य लोनबले, राजेंद्र गेडेकर, विनोद वाघरे, विनायक भादे, सूरज कोटगले, टेकाजी वाढणकर, शामराव चौधरी व जगदीश मेश्राम. उपक्षेत्र व्याहाड : श्री एम. व्ही. पुल्लेवाड, क्षेत्र सहाय्यक; श्री राजेंद्र डांगे, वनरक्षक उपरी; श्री अक्षय मेश्राम, वनरक्षक गायडोंगरी; श्री दिलीप शेडमाके, वनरक्षक सामदा; श्री एकनाथ खुडे, वनरक्षक नवेगाव; गजानन पिपरे, रविंद्र रोहनकर, अनिल भोयर व विलास चुधरी, बीट मदतनीस. उपक्षेत्र राजोली: श्री ए. बी. शेळकि, क्षेत्र सहाय्यक राजोली; श्री एस. जे. आदे, वनरक्षक राजोली; श्री एस. ए. नागोसे, वनरक्षक चितेगाव; श्री एन. वाय. बोरकर, वनरक्षक गोलाभूज; श्री रामभाऊ कडस्कर, क्षेत्र सहाय्यक मदतनीस; सूरज मारभते, समीर बावणे व विशाल कन्नाके. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत वनकर्मचाऱ्यांनी दाखविलेली एकजूट आणि पर्यावरण संवर्धनाप्रती असलेली बांधिलकी या मोहिमेतून अधोरेखित झाली.


