मकोका मध्ये अटक सराईत गुन्हेगार सोहेल मार्फ आफताप खान व शादाब तर्फ बैंड खान याचेविरूध्द दोषारोप दाखल करण्याची परवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिनांक १०.०८.२०२६ रोजी महीला फिर्यादी हिचे तकारीवरून पोलीस अप. क्र. १३०९/२०२६ कलम ७६, ३३३, ११५(२), २९६, ३५१(३) ३(५) भारतीय न्याय संहिता, असा गुन्हा सराईत गुन्हेगार नामे १) शादाबखाँ उर्फ बैंड मुक्त्यारखाँ पठाण, वय ३२ वर्ष, रा. वार्ड क्र.६ बोरगांव मेघ, वर्धा, २) आयुष अजय नगराळे, वय २१ वर्ष, रा. सिद्धार्थ नगर बोरगांव मेघे वर्धा, ३) सोहेल उर्फ आफताब, उर्फ मोंढा अकील खान, वय २६ वर्ष, रा. स्टेशन फैल वर्धा, याचेविरूध्द दाखल झाला होता.
सदर गुन्हयातील आरोपी शादाब उर्फ बैंड खान व सोहेल उर्फ मोंढा खान हे सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर बरेचशे गुन्हे पोलीस अभिलेखावर दाखल असल्याने त्याचेविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ प्रमाणे कलम वाढ करणेबाबतचा प्रस्ताव ठाणेदार वर्धा शहर यांनी तयार करून मा पोलीस अधिक्षक वर्धा याचे मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सा, नागपुर परीक्षेत्र नागपुर याचेकडे दाखल केला असता मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सा यांनी कलम ३(१) (दोन), ३(२), ३(४) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ वाढ करण्याची परवानगी आदेश दिल्याने गुन्हयात दिनांक २५/०८/२०२६ रोजी कलमवाढ करण्यात आली व सदर गुन्हयाचा तपास उपविभागिय पोलीस अधिकारी वर्धा याचेकडे दिली.
तपास अधिकारी यांनी आरोपीतांना अटक करून तपासात सबळ पुरावे गोळा केले. तपास पुर्ण करून दोषारोप पत्र मा न्यायालयात दाखल करण्याची पुर्व परवानगीचा प्रस्ताव मा पोलीस अधिक्षक सा वर्धा याचे मार्फतीने मा श्री निखील गुप्ता, अपर पोलीस महासंचालक साहेब, (कायदा व सुव्यवस्था) मुंबई महाराष्ट्र राज्य याचेकडे दाखल केला असता मा. अपर पोलीस महासंचालक सा. मुंबई यांनी दिनांक ०४.११.२०२६ रोजी सराईत आरोपी नामे १) शादाब उर्फ बैंड मुक्त्यारखाँ पठाण, २) सोहेल उर्फ आफताब, उर्फ मोंढा अकील खान, याचेविरूध्द मकोका दोषारोप दाखल करण्याची परवानगी आदेश दिलेला आहे.
यातील गुन्हेगार १) शादाबखाँ उर्फ बैंड मुक्त्यारर्खा पठाण, २) सोहेल उर्फ आफताब, उर्फ मोंढा अकील खान, याचेवर ४३ केसेस दाखल असुन त्याचेवर या पुर्वी झोपडपटटी दादा कायदयाप्रमाणे कारवाई झालेली आहे.
एखादया आरोपीचा पहीलाच गुन्हा आहे पण तो त्याने गुन्हा सराईत गुन्हेगारासोबत केला तर तो सुध्या संघटीत गुन्हेगारी कारवाईसाठी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ प्रमाणे पात्र आहे. त्याचे संपुर्ण करीअरला बाधा येवु शकते. तरी गुन्हेगारासोबत संगत ठेवणेपुर्वी युवकांनी नोंद घ्यावी
कारबाई मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक वर्धा, याचे मार्गदर्शनात एसडीपीओ श्री सुनिल महाडिक, उपविभाग वर्धा, ठाणेदार नागेशकुमार चतरकर, पोउपनि सुनिल राम, परवेज खान, पो अमलदार गजानन लामसे, संजय बोगा, पवन निलेकर, अरविंद घुगे, समीर शेख, प्रविण मुन पोलीस स्टेशन वर्धा यांनी केली.



