पोलीस स्टेशन, हिंगणघाट हद्दीतील धोकादायक / दारुविक्रेता इसमाची एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, हिंगणघाट हहीतीत धोकादायक / दारुविक्रेता इसम नामे रविन्द्र तुकाराम डेकाटे वय ४१ वर्षे रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा याचेविरुध्द पोलीस स्टेशन, हिंगणघाटचे अभिलेखावर सन २०२० पासुन साथीदारांसह मिळुन अश्लील शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देवुन दुखापत करणे व खुनाचा प्रयत्न करणे, गृह आगळीक करुन अश्लील शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देवुन दुखापत करणे, साथीदारांसह मिळुन गावठी मोहा दारुची तस्करी करणे व विक्री करणे, हद्दपार असतांना सुध्दा प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करुन अश्लील शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देणे, साथीदारासह मिळुन शिवीगाळ करुन खुनाचा प्रयत्न करणे. असे एकुण ०८ गुन्हे नोंद आहे. सन २०२० पासुन स्थानबध्द इसम नामे रविन्द्र तुकाराम डेकाटे याने पोलीस स्टेशन, हिंगणघाट परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचेविरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवुन सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. रविन्द्र तुकाराम डेकाटे याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने व त्याची गुन्हेगारी गतिवीधी थांबत नसल्याने त्याचेविरुध्द कलम ५६ (अ) (ब) मपोका १९५१, कलम १५१(१), १०७,११६ (३) फौ.प्र.सं. १९७३, कलम ११० (ग) फो.प्र.सं.१९७३, कलम ५६(१) (अ) (ब) मपोका १९५१, कलम ३ एम.पि.डी.ए.१९८१, कलम १२९ (ई) भा. ना. सु. सं. २०२३ अंतर्गत प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या होत्या. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसून त्यानंतरही सतत गुन्हे करीत होता.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, श्री. अनिल राऊत, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानयध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, मा. श्रीमती वान्मथी सी. यांचेकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानबध्य आदेश जारी करुन रविन्द्र तुकाराम डेकाटे यास छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह, येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानयध्द आदेशांन्वये त्याला छत्रपती संभाजीनगर मध्यवती कारागृह, येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
वर्धा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी, तसेच सण उत्सव शांततेत पार पडावे या उद्देशाने अशाच प्रकारे अवैधरीत्या दारुविक्रेत्यांवर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवतर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कटोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथो सी., तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांनी दिलेले आहे
सन – २०२५ मध्ये एकुण १८ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले होते. तसेच सन २०२६ मध्ये अद्याप पावेतो १३ गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना तसेच अवैध दारुविक्रेते यांना विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री. सुनिल महाडीक, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, पो.नि. विनोद चौधरी, स्थानिका गुन्हे शाखा, वधां यांचे मार्गदर्शनात पो. हवा. अमोल आत्राम, आशिष महेशगोरी नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि. अनिल राऊत, पोलीस अंमलदार पो.हवा. प्रविण देशमुख, पो. अं. संग्राम मुंडे, शिवशंकर यादव, संतोष लोहटे, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांनी केली आहे.



