ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोर गरिबांच्या अंधाऱ्या संसारात माणुसकीचा दीप उजळला 

सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने आनंदाचा शिधा वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना, व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देऊळगाव राजा यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे तसेच गरजू लोकांच्या घरी जाऊन दीपावलीच्या पूर्वसंध्येला शहरातील गरजू गरीब लोकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले,

दुष्काळसदृश परिस्थिती मुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गरजू कुटुंबांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने माणुसकीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला, दिवाळीच्या पावन पर्वावर गरजू कुटुंबांना आनंदाचा शिधा किराणा किट चे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली, समाजातील वंचित गरजू आणि आर्थिक दृष्टीने दुर्बल घटकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलावे, त्यांनाही सणासुदीचा आनंद अनुभवता यावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला,

सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी, सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा येथील अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, ज्येष्ठ नागरिक संघटना चे कार्याध्यक्ष मधुकर शेळके, सचिव गोविंदराव बोरकर, प्रा. अशोक डोईफोडे, प्रा विजय रायमूल, प्रकाश अहिरे, अरुण सपाटे, घनश्याम भंडारे मधुकरराव धुळे, पंडितराव पाथरकर, शांतीलाल निरफळे, सुशील हनुमंते, प्रा विनायक कुळकर्णी, प्रा अविनाश राजे जाधव, बाबुलाल शिवरकर शिवाजी धुळे, यांच्या हस्ते गरजु व्यक्ती ला किट चे वाटप करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये