ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवाळी व आगामी सण-उत्सव सुरक्षित, शांततापूर्ण व प्रदूषणमुक्त वातावरणात साजरे करा-पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे नागरिकांना आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आगामी दिवाळी तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच ध्वनी व वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिक, व्यापारी, फटाके विक्रेते, व्यावसायिक यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वर्धा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे. दिवाळी हा आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण असून तो सर्वांनी सुरक्षित वातावरणात साजरा करणे आवश्यक आहे. सण-उत्सवांच्या काळात फटाक्यांची आतिषबाजी, गदी, वाहतुकीची वर्दळ तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमुळे अपघात, आग लागणे, ध्वनीप्रदूषण आणि कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून प्रशासनास सहकार्य करावे.

फटाके फोडताना घ्यावयाची काळजी व नियम

सर्वोच्च न्यायालय व शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार रात्री १०.०० ते सकाळी ६.०० या कालावधीत फटाके फोडण्यास मनाई आहे. नागरिकांनी निर्धारित वेळेचे पालन करावे.

केवळ अधिकृत व मान्यताप्राप्त फटाक्यांचीच खरेदी व विक्री करावी. प्रतिबंधित किंवा नियमबाह्य फटाक्यांची विक्री अथवा वापर कर नये.

फटाके फोडताना लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, रुग्ण तसेच श्वसनविकार असलेल्या व्यक्तीना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.

रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये व इतर शांतता क्षेत्रांच्या परिसरात ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करावे.

फटाके फोडताना मोकळ्या जागेचा वापर करावा. घरांच्या आतील भागात, बंदिस्त जागेत, वाहनांच्या जवळ किंवा ज्वलनशील पदार्थांच्या परिसरात फटाके फोडू नयेत.

फटाके फोडताना पाणी व अग्निशमनासाठी आवश्यक साहित्य जवळ ठेवावे. लहान मुलांनी मोठ्यांच्या देखरेखीखालीच फटाके फोडावेत.

फटाके फोडल्यानंतर उरलेले अवशेष सुरक्षितपणे विल्हेवाट लावावेत. न फुटलेले फटाके पुन्हा पेटविण्याचा प्रयत्न करू नये.

फटाके विक्रेते व व्यावसायिकांसाठी सूचना

फटाक्यांची विक्री केवळ सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या वैध परवान्याच्या आधारेच करावी.

विक्रीच्या ठिकाणी अग्निसुरक्षेची आवश्यक साधने उपलब्ध ठेवावीत. अग्निशामक यंत्र, पाण्याची व्यवस्था व आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग सुस्थितीत ठेवावा.

फटाक्यांच्या दुकानांमध्ये विद्युत उपकरणे, ज्वलनशील पदार्थ व आग निर्माण होण्याची शक्यता असलेल्या

वस्तूंबाबत विशेष दक्षता घ्यावी.

परवानाधारक विक्रेत्यांनी नियमबाहा, प्रतिबंधित किंवा विनापरवाना फटाक्यांची विक्री करू नये.

नागरिकांसाठी कायदा व सुव्यवस्थेबाबत आवाहन

सण-उत्सवांच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवा, आक्षेपार्ह संदेश किया समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत.

धार्मिक भावना दुखावतौल किंवा दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये.

सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी मिरवणुका, ध्वनिक्षेपक किंवा इतर कार्यक्रम आयोजित करू नयेत.

मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. वाहतुकीचे नियम पाळावेत व वाहन चालविताना स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.

बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे व सार्वजनिक परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

नागरिकांनी कोणत्याही अनुचित घटना किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

वर्धा पोलीस दल सज्ज

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आवश्यक पोलीस बंदोबस्त, नियमित गस्त, संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष, बाजारपेठांमध्ये पेट्रोलिंग तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सण-उत्सव हे आनंद, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविणारे असावेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासन व पोलीस दलास सहकार्य करून दिवाळी व आगामी सर्व सण-उत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.

“सण आनंदाचा, संकल्प सुरक्षिततेचा दिवाळी प्रदूषणमुक्त आणि वर्चा जिल्हा शांततापूर्ण!”

वर्धा जिल्हा पोलीस प्रशासन

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये