ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर शहरात फटाके वाजविण्यावर निर्बंध

ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई होणार

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : शहरातील वाढते वायू व ध्वनीप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. फटाक्यांचा अनियंत्रित वापर, ध्वनिक्षेपकांचा मोठ्या आवाजात वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली आहे.

या सूचनेनुसार सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, पदपथ व चौकांमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील घोषित शांतता क्षेत्रात १०० मीटरच्या परिघात ध्वनिक्षेपक व फटाक्यांच्या वापरावर निर्बंध राहणार आहेत.

ध्वनिक्षेपक व साऊंड सिस्टिमचा वापर करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरणे तसेच निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणे आढळल्यास संबंधित साहित्य जप्त करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात ६५ व ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात ५५ व ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात ५० व ४० डेसिबल अशी ध्वनीमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेने नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त श्री. संदीप चिद्रावार यांची नियुक्ती केली आहे. तक्रार निवारण कक्ष अग्निशमन विभाग, चंद्रपूर महानगरपालिका येथे कार्यरत असून नागरिकांनी आपल्या परिसरातील ध्वनीप्रदूषणाबाबत तक्रारी नोंदवाव्यात, निवारण कक्षचा हेल्पलाईन क्रमांक १०१,०७१७२ २५४६१४, ९८२३०१७१०१ १८००५३२१५७५ हा आहे. तसेच प्रभागनिहाय ई-मेल आयडी

Zone-1: cmczoneno1@gmail.com, Zone-2: cmczoneno2@gmail.com, Zone-3: cmczoneno3@gmail.com असे आवाहन करण्यात आले आहे.

ध्वनीप्रदूषणमुक्त आणि स्वच्छ चंद्रपूर शहरासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये