ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या उपस्थितीत वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांच्या भद्रावती येथील दौराप्रसंगी पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे पुर्व अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या समवेत दि. १४ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकरी व युवकांच्या मागण्यांबाबत अतिशय सकारात्मक चर्चा झाली.

        कोल इंडिया बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आलेल्या निर्णयानुसार, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत जमिनीला नोकरीसह जुन्या दरामध्ये वृध्दी करून प्रति एकर 30 लाख रूपये इतका दर देण्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच प्रकल्पग्रस्त युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अधिग्रहीत जमिनीच्या जिल्ह्यांतर्गतच रोजगार उपलब्ध करून देण्याविषयी या बैठकीत मंत्री महोदयांसोबत चर्चा करण्यात आली. सदर मागणीबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले.

            मागील २ वर्षांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यानंतर प्रकल्पग्रस्त कुटूंबातील नातवास (ग्रॅंड सन) नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, धोरणामध्ये तरतुद असतांनाही आणि गत 2 वर्षांपासून माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयातील 5 ते 6 खटल्यांमध्ये निर्णय येऊनही नातीला (मुलाची मुलगी) तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीच्या मुलास किंवा मुलीस नोकरी देण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने यावर तातडीने निर्णय घेण्याबाबत बैठकीमध्ये आग्रही मागणी करण्यात आली.

          याशिवाय अरविंदो इन्फ्रा. लिमी. कंपनीद्वारा पुनर्वसन, रोजगार आणि जमीन अधिग्रहणाशी संबंधित समस्यांवर मार्ग काढण्यासाठीही चर्चा झाली. वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत रेल्वे सायडिंगकरिता अधिग्रहीत होणाऱ्या जमिनीला भुमी अधिग्रहण कायद्यानुसार योग्य मोबदला देण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आले. सनफ्लॅग कंपनीकडून विसापूर-नांदगांव परिसरातील जमीन वेकोलिसाठी अधिग्रहीत करण्याबाबत, त्यासंदर्भातील जमिनीचा भाव व रोजगार विषयक प्रश्नांवरही बैठकीत उहापोह करण्यात आला. यासोबतच बाबुपेठ बी.जी. (ब्रॉडगेज) रेल्वे लाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

            सदर बैठकीत चर्चील्या गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी लवकरच उचित निर्णय घेण्यासंदर्भात मंत्री महोदयांनी हंसराज अहीर यांना यावेळी आश्वासन दिले. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणात एसओपीमध्ये बदल करण्याचे निर्देश दिल्याबद्दल हंसराज अहीर यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये