ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरदार पटेल महाविद्यालयात SEBI Smart तर्फे Workshop चे आयोजन यशस्वी ठरले

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित, सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर,  येथील  अर्थशास्त्र विभागातर्फे दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता “Introduction to Security Market and  Financial Planning”,  या विषयावर एक दिवसीय Workshop चे आयोजन करण्यात आले. सरदार पटेल महाविद्यालयाच्या वतीने   महाविद्यालयाचे वार्षिकांक शब्दगंधा देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते SEBI Smart श्री राहुल खरवडे यांनी पीपीटी प्रेझेंटेशन आणि एक्सेल शीट द्वारे सद्य परिस्थितीशी संबंधित विषयाचे खूप सखोल आणि स्पष्टीकरणात्मक असे मार्गदर्शन केले. तसेच प्राध्यापकांकडून येणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.

कार्यक्रमाला सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एम काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार सर आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शरयू पोतनूरवार, अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वैशाली नंदुरकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.आकाश वाळके सरांनी केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शरयू पोतनूरवार यांनी हा कार्यक्रम अर्थशास्त्र विभागातील कार्यरत प्राध्यापकांच्या सहाय्याने आयोजित केला. प्रा. मनीषा गहूकर , प्रा. प्रेक्षणा बागेसर आणि सरदार पटेल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, श्री. अमर व इतर शिक्षकेतर कर्मचारी  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये