ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला विनयभंग प्रकरणातील आरोपी दोषी

२०२२ मधील गुन्ह्यात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          महिलेशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात भद्रावती येथील प्रथम श्रेणी दिवाणी व फौजदारी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. न्यायालयाच्या या निकालामुळे भद्रावती पोलिसांच्या तपासाला यश आले आहे.

चंपत नानाजी वासेकर (वय ५३, रा. बुद्ध लेणी परिसर, विजासन, भद्रावती) याच्याविरुद्ध २५ एप्रिल २०२२ रोजी भद्रावती पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अन्वये अप. क्र. १५२/२०२२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुळजेवार यांनी केला. तपासादरम्यान आवश्यक पुरावे व साक्षीदारांच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सहायक सरकारी अभियोक्ता संजय ठावरी यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली.

या खटल्यात कोर्ट पैरवी महिला पोलीस हवालदार संचिता (बक्कल क्र. १२७९) तसेच कोर्ट मोहरर सहायक पोलीस उपनिरीक्षक कन्होबा दुर्गे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपी चंपत वासेकर याला दोषी घोषित केले.

भद्रावती पोलिसांच्या प्रभावी तपासासह न्यायालयीन पाठपुराव्यामुळे या प्रकरणात यश मिळाले असून, महिला सुरक्षेबाबत पोलिसांची कटिबद्धता या निकालातून अधोरेखित झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये