ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

RCERT चे प्रा. डॉ. अविनाश चल्लेलवार यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

युनिव्हर्सिटी ऑफ बर्न स्वित्झर्लंड तर्फे  'लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड 2026' जीवनगौरव पुरस्कार प्रदान

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील गणित विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. अविनाश चल्लेलवार यांना प्राचीन वैदिक गणित शिक्षण, संशोधन, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि शैक्षणिक नेतृत्व क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड 2026’ जीवनगौरव पुरस्कार या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार Edwin Incorporation, & University of Bern, Switzerland यांच्या वतीने 9 ते 11 मे 2026 या कालावधीत स्वित्झर्लंड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रदान करण्यात आला. International forum on Knowledge, Culure & Development परिषदेत विविध देशांतील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

डॉ. अविनाश चल्लेलवार वैदिक गणिताचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांनी वैदिक गणितावरील अनेक संशोधनपर लेख प्रकाशित केले असून, मानसिक गणित, जलद गणना आणि वैदिक सूत्रांचा गणितातील वापर यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.  शालेय विद्यार्थ्यांसाठी वैदिक गणितावर आधारित कार्यशाळा आयोजित करणे, या कार्यशाळांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे, मानसिक गणनकौशल्य विकसित करणे. कार्यशाळांमध्ये वैदिक गणितातील विविध तंत्रांचा परिचय करून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, सराव, संकल्पनात्मक समज, गणिताविषयी आत्मविश्वास वाढवणे हा आहे. प्राचीन वैदिक गणित या विषयाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि प्रशिक्षण देणे, प्राचीन वैदिक गणित विषयातील उत्कृष्ट अध्यापन, संशोधन, विद्यार्थी मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक कार्यातून मोलाचे योगदान डॉ. अविनाश यांनी दिले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि शिक्षण क्षेत्रातील समर्पित सेवाभावाची दखल घेत त्यांना हा बहुमानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या संशोधनाचा उद्देश प्राचीन भारतीय गणितातील संकल्पनांचा आधुनिक शिक्षण आणि संशोधनात उपयोग वाढवणे हा आहे. तथापि, त्यांना पुढील परिषदेसाठी अनुदान मंजूर झाले आहे.

प्रा. डॉ. अविनाश चल्लेलवार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर चे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये