सेवाग्राम पोलीस स्टेशन चे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांची धडक कामगीरी पोलीस स्टॉप च्या मदतीने सापळा रचून केला 11 लाख 15, हजार 800/₹चा देशी विदेशी दारू व फोरव्हीलर कार सह मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :- उपरोक्त विषयान्वये सविनय सादर आहे की, आज दिनांक 02/08/2026 रोजी चे 23/40 वा सुमारास मुखबीर कडुन मीळालेल्या माहीतीचे आधारे मौजा दत्तपुर येथील उड्डाण पुलाचे खाली बायपास रोडवर मा. ठाणेदार श्री देवेन्द्र ठाकुर पोलीस स्टेशन सेवाग्राम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टॉफ पोहवा, संदीप मेंढे /731 पोशि अक्षय गुडाफे ब.न. 930, पोहवा. विलास लोहकरे ब.न.313, सफौ सतीश दरवरे /582 पोहवा. नितीन राजपुत /642 यांचे मदतीने सापळा रचुन नाकेबंदी केली असता यातील खच्चरेतील हुंडाई पांढ-या रंगाची कार क्र. एमएच.28 व्ही.9465 हीने नमुद कार चा चालक (नाव महीत नाही) हा मध्यप्रदेशातील विक्री करीता उपलब्ध असलेली देशी विदेशी दारु ती कार मध्ये भरुन वर्धा येथे विक्री करीता आणत असल्याचे माहीती वरुन मौजा दत्तपुर येथील उड्डाण पुलाचे खाली बायपास रोडबर नाकेबंदी केली असता, यातील नमुद कार चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाणे चालवुन पळुन गेला. कार चा पाठलाग केला असता. यातील कारचे चालकास आपण पकडल्या जावु शकु असे वाचल्याने त्याने कार व गाडीतील मुद्देमाल सोडुन पसार झाला. त्यामुळे कारची पंचासमक्ष पाहाणी केली असता.
कार मध्ये विदेशी दारुचा साठा मीळुन आल्याने 1) हुंडाई पांढ-या रंगाची कार क्र. एमएच.28 व्ही.9465 कि. 7 लाख रुपये 2) नमुद कार मध्ये मीळुन आलेल्या एकुण 28 दारुचे पेट्यामध्ये वेगवेगळ्या कम्पनीच्या विदेशी दारुच्या शिश्या असा एकुण जुमला कि. 11,15,800/-रु चा माल मीळून आल्याने जप्त करुन हुंडाई पांढ-या रंगाची कार क्र. एमएच, 28 व्ही.9465 चा चालका विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, मा. उपविभा. पो. अधी. वर्धा श्री सुनिल मंडलीक, यांचे आदेशान्वये पोलीस स्टेशन सेवाग्राम चे ठाणेदार श्री देवेन्द्र ठाकुर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टॉफ पोहवा. संदीप मेंढे /731 पोशि अक्षय गुडाफे ब.न. 930, पोहवा. विलास लोहकरे ब.न.313, सफौ सतीश दरवरे /582 पोहवा. नितीन राजपुत /642 यांनी केलेली आहे.



