अवैद्यरित्या वाहतुक करुन साठवणूक करणाऱ्या आरोपीतांवर रेड करुन फोरव्हीलर गाडी व विदेशी दारु व बिअर कॅनसह एकुण १४,२०,८००/- रु. चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत

चांदा ब्लास्ट
वर्धा :- स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक पोलीस स्टेशन, सेलु हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, इशान अनिलराव आदमने, वय २९ वर्ष रा. कुटकी तळोदी ता. सेलु जि. वर्धा ह.मु. केळकरवाडी, वर्धा हा त्याचे ताब्यातील मारूती सुझुकी ईटिका चारचाकी वाहन क. एमएच ३२ एएक्स ३३९७ ने नागपुर जिल्हयातुन वर्धा येथे विक्री करीता घेवुन येत आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने सदरची माहीती स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा चे प्रमुख.
विनोद चौधरी यांना देवुन त्यांनी दिलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे अत्यंत गोपनीयता बाळगुण स्थानीक गुन्हे शाखेचे पथका मार्फत नागपुर ते वर्धा हायवे रोडवरील भारत पेट्रोलीयम पेट्रोल पंप समोर, सेलु येथे नाकेबंदी करीत असतांना थोडया वेळात माहीती प्रमाणे मारूती सुझुकी ईटिका चारचाकी वाहन क. एमएच ३२ एक्स ३३९७गाडी येतांना दिसली त्यास थांबण्याचा ईशारा दिला असता त्याने त्याचे ताब्यातील वाहन थांबवीले, वरून आरोपीस त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव इशान अनिलराव आदमने, वय २९ वर्ष रा. कुटकी तळोदी ता. सेलु जि. वर्धा ह.मु. केळकरवाडी, वर्धा ता. जि. वर्धा असे सांगतिले तसेच सदर माल हा २) शाहरूख बेग रा. इतवारा बाजार, वर्धा याचे असल्याचे सांगतिले वरून सदर वाहन ताब्यात घेवुन त्याची पाहणी केली असता वाहनामध्ये विदेशी दारूने भरलेल्या वेग वेगळया कंम्पनीच्या सिलबंद शिश्या तसेच बडवायझर मॅग्नम, कासबर्ग व ट्युबर्ग कंम्पनीच्या बिअर कॅन कि. २,२०,८००/- रू. व मारूती सुझुकी ईटिका चारचाकी वाहन क्र. एमएच ३२ एक्स ३३९७ किमंत १२,००,०००/- रू. असा एकुण जु. किंमत १४,२०,८००/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त केला.
यातील आरोपीतांनी मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनाचे सहायाने अवैद्यरीत्या विदेशी दारु व बिअर कॅन ची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने दोन्ही आरोपीतां विरुध्द पोलीस स्टेशन, सेलु येथे कलम ६५(अ) (ई), ७७ (अ), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा सहकलम मोटर वाहन कार्यदयान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनी. राहुल इटेकार, पोलीस अंमलदार भुषण निघोट, धर्मेंद्र अकाली, अमोल नगराळे, मंगेश चावरे, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.



