ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : हंसाबाई रुपारेल यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ येथील नारायणा स्वीट मार्ट व मधुरम रेस्टॉरंटचे संचालक संताजी नगर निवासी खुशाल ऊर्फ रिची प्रकाशभाई रुपारेल यांच्या मातोश्री हंसाबाई प्रकाशभाई रुपारेल यांचे रविवारी (दि. १५ मार्च) दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या ६५ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुली, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी ६ वाजता स्थानिक मल्हारा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.



