अल्का आत्राम जोपासात आहे सामाजिक वारसा व्यक्ती – हरीश शर्मा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती व अलका आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर
पोंभुर्णा : आदरणीय सुधीर भाऊ मुंगनटीवार यांच्या कार्यकर्ते असलेल्या अल्का आत्राम यांनी आपल्या गुरुचा वसा जोपासात सामाजिक बांधिलकीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा माणसं अल्का ताई मित्र परिवाराने व्यक्त करीत आज क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री कुमारी अलका आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र चिकित्सा तपासणी व शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मे वाटप रक्तदाब मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. ज्यांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांची नोंदणी करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अनेक गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिरात 700 रुग्णाची तपासणी करण्यात आली यावेळी अनेक रुग्णांना शास्त्रक्रिया सांगण्यात आली अनेक रुग्णांना चष्मा देण्यात येईल.त्याच बरोबर भाजपा महिला मोर्च्या चे वतीने फळ वाटप अनेक शाळा मध्ये नोटबुक पाणी बॉटल वितरित करण्यात आले.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा देण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.यावेळी अल्का आत्राम यांनी बोलताना सांगितले की माझा वाढदिवस गोरगरीब जनतेच्या सेवेने साजरा होतो हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रम ला उदघाटक म्हणून श्री हरीश शर्मा जिल्हा अध्यक्ष भाजपा, अध्यक्ष म्हणून पोंभुर्णा तहसीलदार मोहनीश शेळवटकर सर प्रमुख उपस्थिती यावेळी अल्का आत्राम अतिथी म्हणून नागराध्यक्ष सुलभा पीपरे, अजित मंगळगिरीवार उपनगराध्यक्ष हरीश ढवस अध्यक्ष भाजप पोंभुर्णा रवींद्र मारपल्लीवार सभापती कृषी उत्त्पन्न बाजार समिती राखूडे सर वनपरीक्षेत्र अधिकारी श्री कन्नाके सर अधीक्षक ग्रामीण रुग्णालय ठाणेदार वंजारी सर विनोद देशमुख महामंत्री, यादव सर काशीसिह तुळशीराम रोहनकर पांडुरंग पाल महेश रणदिवे संजय कोडापे वैशाली बोलमवार नंदा कोटरंगे शारदा गुरनुले मंचवार उपस्थित होते या कार्यक्रम आयोजन साठी अल्काताई मित्र परिवारातील सर्व सदस्यनी मेहनत करून शिबीर यशस्वी केले.
या कार्यक्रमचे संचालन अजय मस्के प्रास्ताविक रवींद्र गेडाम आभार वैशाली बोलमवार यांनी मानले यावेळी तालुक्यातील गोरगरीब जनतेनी मोठया संख्येनी आज लाभ घेतला त्यामुळे अल्का ताई मित्र परिवार यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.



