ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीचे अतुल कोल्हे यांची नानक साई अवॉर्ड २०२६ करिता निवड : नानक साई पुरस्कार जाहीर

शिर्डी येथे नानक साई फाउंडेशन तर्फे भव्य दिव्य साई सम्मेलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

श्री साई शिर्डी येथे नानक साई फाउंडेशन तर्फे भव्य दिव्य असे साई सम्मेलन दिनांक. २५ मार्च २०२६ रोज बुधवारला आयोजित करण्यात येत आहे. या अनुषंगाने देशातील सर्व साई भक्तांचे महासंमेलन होणार असून संमेलनाच्या औचित्यावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महानुभावांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. तश्या आशयाचे आदरपूर्वक निमंत्रण नानक साई फाउंडेशन, महाराष्ट्र चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे व नानक साई फाउंडेशन चे केंद्रीय उपाध्यक्ष प्रीतम सिंह भाटिया यांचे तर्फे पत्रकार अतुल कोल्हे यांना देण्यात आले आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अतुल कोल्हे यांच्या भरीव कामगिरीची तथा सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली असून नानक साई अवॉर्ड २०२६ ने त्यांना सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात येणार आहे.

त्यांच्या निवडीबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत असून पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तीचा सन्मान होत असल्याने पत्रकार तथा भद्रावतीकरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये