ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र. १०६/१५ कलम ३२४, ३४ भादंवि मधील आरोपीस शिक्षा ठोठावली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिंगणघाट येथील मा. कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय श्री. ए.बी. इंगोले, हिंगणघाट कोर्ट नं २ यांनी अप.क्र. १०६/२०१५ कलम ३२४, ३४ भादंवि मध्ये आरोपी क्र. १) संदीप मुरलीधर पराते, वय ३१ वर्षे, २) मुरलीधर पराते, वय ६४ वर्षे, दोन्ही रा. कोपरी, ता. राळेगांव जि. यवतमाळ यास खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.

शिक्षेचा तपशील :-

१. कलम ३२४, ३४ भादंवि मध्ये दोषी ठरविण्यात आले असुन ६ महिने साधा कारावासाची शिक्षा व ५००/- रु दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावासाची शिक्षा.

घटनेचा थोडक्यात तपशील :- यातील फिर्यादी नामे उमेश गुलाबराव परचाके, वय ३१ वर्षे, रा.इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट आपले घरी हजर असतांना त्याचे बहिण जावाई व जावाईचे वडील फिर्यादीकडे येवून फिर्यादीने दरवाजा उघडताच आरोपीतांनी फिर्यादीस संगणमत करून आरोपी क्र.१ याने कुऱ्हाडीने पाठीवर मारून जखमी केले व आरोपी क्र.२ याने पकडून ठेवून लाथाबुक्याने मारहाण केले. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून व वैद्यकीय अहवालावरून पो.स्टे. हिंगणघाट अप.क्र.१०६/१५ कलम ३२४, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पोहवा. मारोती वाघाडे, ब.नं १११२ पो.स्टे. हिंगणघाट यांनी करुन मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्री. रवीकुमार चौधरी यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व त्यांना पैरवी अमंलदार मपोहवा/सिमा जांगडेकर, ब.नं ९५१ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाची कामगीरी बजावली आहे. तसेच पो.स्टे हिंगणघाट ठाणेदार पो.नि.श्री. राऊत यांनी सुध्दा सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपी विरूध्द प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदशन केले आहे. मा. कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय श्री. ए.बी. इंगोले, हिंगणघाट कोर्ट नं २ यावरून गुन्ह्यातील आरोपी यास कलम ३२४, ३४ भादंवि मध्ये दोषी ठरविण्यात आले असुन ६ महिने साधा कारावासाची शिक्षा व ५००/- रु दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.

(विनोद चौधरी)

पोलीस निरीक्षक

स्था.गु.शाखा वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये