9 ऑगस्ट रोजी नागपूर येथे वसंत योद्धा पुरस्कार वितरण सोहळा’ चे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वसंतराव नाईक परसबाग या संकल्पनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या *परसबाग असावी दारी’* या उपक्रमांतर्गत *‘वसंत योद्धा पुरस्कार वितरण सोहळ्याचे’* आयोजन *क्रांतिदिनी, ९ ऑगस्ट २०२६** रोजी नागपुरात करण्यात आले आहे. हा सोहळा *उत्कर्ष सभागृह, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर* येथे सकाळी *११.०० वाजता पार पडणार असून, या कार्यक्रमाचे आयोजन,ज्ञानप्रकाश लोकसंस्था* यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन *मा. सुभाष जाधव*(संवर्ग विकास अधिकारी, पारशिवनी, जि. नागपूर) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *मा. इंजि. आत्मारामजी चव्हाण* (नायक, नागपूर नगरी) राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून *मा. अॅड. बद्रीप्रसाद चव्हाण* (कारभारी, नागपूर नगरी) उपस्थित राहतील. कार्यक्रमास **मा. कमलकिशोर फुटाने साहेब*(अतिरिक्त मुख्यकार्यपालन,जि.प.,नागपूर) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमासाठी *प्राचार्य प्रा. राम गावंडे*(कृषी महाविद्यालय, नागपूर व प्रमुख योग प्रशिक्षक) आणि *मा. सचिन सूर्यवंशी* (संवर्ग विकास अधिकारी,काटोल) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी पारंपरिक बंजारा (गोरमाटी) भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे *मा. ह.भ.प. बंडू रामदास राठोड उर्फ बंडू महाराज दापकेकर (मुंबई)* यांचा प्रमुख मानकरी म्हणून गौरव करण्यात येणार आहे.
तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा *कार्यानुसार वेगवेगळे पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार असून, त्यामध्ये मा. उमेश पवार (चालते,बोलते आणि कर्ते विद्यापिठ) *मा. संजय राजुळे,लातूर*,(आपले आरोग्य -आपली जबाबदारी) *मा. सुदाम राठोड, जिवती,*(सर्व सामान्यांसाठी अविरत संघर्ष) आणि *मा. दिपक घोगरे,मूल, चंद्रपूर* (प्रयोगशिल,प्रगती शिल,उद्यमशिल शेतकरी) यांचा समावेश आहे.
समाजात पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती,सेंद्रिय शेती, शिक्षण, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



