ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवघाट टोल नाक्यावर परंप्रांतीय कर्मचाऱ्याची मनमानी आवरा अन्यथा आंदोलन होणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

      चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 353 बी या मार्गावर देवघाट या ठिकाणी जी आर आय एल इन्फ्रा कंपनीने राष्ट्रीय महामार्ग बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच सप्टेंबर 2025 मध्ये टोल नाक्याला सुरुवात केली.

या टोल नाक्यामध्ये अंकित सिंग व करण या परप्रांतीय जोडीने मुजोरी व अरेरावी करून अनेक वाहन चालकांना अपमानीत करण्याचा प्रकार नेहमी घडत असल्याने त्या परप्रांतीय टोळी च्या अरेरावी वाढली आहे स्थानिक जवळच्या नागरिकांना लोणी वरून वनसडी जाण्यासाठी दोन किलोमीटर रस्त्याच्या वापरण्यावर सुद्धा टोल वसुली केल्या जात आहे या भागातील अनेक वाहन चालकांनी पास प्राप्त केले मात्र अनेक वेळ फास्टटॅग सुविधा असून सुद्धा कॅमरेमध्ये अचूक निदान होत नसल्याने अडवणुक करुण परंप्रातिय भाषेत हट जाव गाडी बाजू लगाव नही तो पोलीस तक्रार दुंगा असे धमकी ची भाष वापरत असल्याने अंकीत .करण जोडी चा बदोबस्त करावा अन्यथा स्थानिक लोकाना डावलून बाहेर राज्यच्या मॅनेजर ची मनमानी खपवित्या जाणार नाही नागरीका मध्ये चिड निर्माण झाली असून असंतोष वाढत आहे

महामार्ग प्राधिकरण यांनी दखल घेऊन बदोबस्त व नागरीकाना चांगली सुविधा उपलब्ध करावी व टोल नाक्यावरील कर्मचार्याना शिस्तीचे धडे द्यावे अशी मागणी पत्राद्वारे राजमार्ग मंत्रालय व प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्याना राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली यांनी दिले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये