ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
“गांजा विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :- पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 03 ऑगस्ट 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे ॲंटी नार्काेटिक्स पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन सेलु हद्दीतील मौजा केळझर गणेश नगर वार्ड नं. 01 येथे रूखा धनवे याचे राहते घरी एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपी रूखा भूजाजी धनवे व त्याचा मुलगा आरोपी आशीद रूखाजी धनवे असे दोघेही संगणमताने गांजा अंमली पदार्थाची विक्री करतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आल्याने, तसेच झडती दरम्यान त्यांचेजवळ गांजा अंमली पदार्थ व गांजा विक्री करून प्राप्त केलेली नगदी रक्कम व मोबाईल मिळुन आल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपींचे ताब्यातुन निव्वळ 526 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, नगदी रक्कम, मोबाईलसह जु.कि. 26,850 रू चा मुद्देमाल जप्त करून एकुण 02 आरोपीविरुद्ध पो.स्टे. सेलु येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



