ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा नियोजन समितीवर बंडू हजारे यांची वर्णी

गोंडपिपरीत कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ शिवसेना (शिंदे गट) चंद्रपूर जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे गोंडपिपरी तालुक्यासह जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बंडू हजारे हे गोंडपिपरी तालुक्याचे भूमिपुत्र असून, गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत. जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कार्यकर्त्यांना संघटनेत संधी देणे, त्यांना नेतृत्वासाठी प्रोत्साहित करणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये मानली जातात.

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी झालेली त्यांची नियुक्ती ही त्यांच्या राजकीय व संघटनात्मक कार्याची दखल मानली जात आहे. या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी तसेच गोंडपिपरी तालुक्यातील प्रलंबित विकासप्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी त्यांना महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.

या निवडीबद्दल शिवसेना शिंदे गटाचे गोंडपिपरी तालुकाप्रमुख नितीन काकडे, शहर नेते सुनील संकुलवार, संजय माहुरवार, उपजिल्हाप्रमुख नितीन धानोरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंडू हजारे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

        “बंडू भाऊ यांच्या नेतृत्वात काम करताना आम्ही पूर्ण ताकदीने काम करतो. त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याचा आम्हाला आनंद असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”

*नितीन काकडे, तालुकाप्रमुख, शिवसेना(शिंदे), गोंडपिपरी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये