ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काळजाचा ठोका चुकविणारा अपघात : आठ वर्षीय बालक बचावला

अल्पवयीन दुचाकीस्वाराचा बेदरकारपणा सीसीटीव्हीत कैद : गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             शहरातील नागसेन नगर परिसरात भरधाव दुचाकीने आठ वर्षीय सायकलस्वार बालकाला धडक दिल्याची घटना दि.०३ रोजी सायंकाळी घडली. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. सुदैवाने या अपघातातून बालक बचावले.

प्राप्त माहितीनुसार, एमएच ३४ डब्ल्यू ६७६६ क्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव जाणाऱ्या १७ वर्षीय विधिसंघर्ष बालकाने नागसेन नगर येथील न्यू शॉप वस्त्र दुकानाजवळ शिकवणीवरून रस्ता ओलांडून घरी जाणाऱ्या प्रियांशु देसाई (८, रा. बगळे वाडी) या सायकलस्वार बालकाला धडक दिली. सायंकाळी ६.४८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित दुचाकीस्वार हा भद्रावती येथील हनुमान नगर परिसरातील रहिवासी आहे.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.बालकाला उपचारासाठी डॉ. मानवतकर हॉस्पिटल येथे दाखल केलेअसून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.. . या प्रकरणातअद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नसून, हेड कॉन्स्टेबल धनपाल तोडासे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, नागसेन नगर परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, या मागणीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

अल्पवयीनांच्या हाती दुचाकी देणाऱ्या पालकांवर कारवाई कधी? हा प्रश्नही या घटनेनिमित्ताने ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन चालकांसोबतच त्यांना वाहने उपलब्ध करून देणाऱ्या पालकांवरही कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नशीब बलवत्तर म्हणून बालक बचावले; अन्यथा दीपावलीच्या पूर्वसंध्येला मोठी दुर्घटना घडली असती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये