ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा शहर डीबी पाथकाची हत्यार घेऊन फिरणाऱ्या युवकावर कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर या प्रमाणे आहे की पो.स्टे.परीसरात पेट्रोलिंग करित असतांना आम्हास मुखबिर कडुन माहीती मिळाली कि,महिला आश्रम रोड, झुडिओ समोर, खुल्या मैदान परिसर , वर्धा येथील सार्वजनिक ठिकानी एक इसम हा त्याचे हातात धारदार चाकु बाळगुन दहशत पसरवित आहे व जोरजोरात ओरडत आहे अशा माहीती वरुन पंच व पो.स्टाँप सह खबरे प्रमाणे महिला आश्रम येथे गेलो असता एक इसम सार्वजनिक ठिकानी धुमधाम करीत दिसुन आला त्यास पंचाना दाखवुन पोस्टाँफच्या मदतीने घेराव टाकुन त्यास शिताफितीने ताब्यात घेवुन त्याला निशस्त्र करुन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शाहिद शाकीर पठाण वय 21 वर्ष रा. प्रबुद्ध नगर, म्हसाळा जि. वर्धा असे सांगितले वरुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेवुन त्याच्या हातातुन एक लोखंडी धारदार असलेली चाकु मिळुन आल्याने सदर घटनास्थळ मौका जप्ती पंचनामा करुन सदर चाकु पंचासमक्ष जप्त करुन सदर घटने संबंधाने ई-साक्ष अँप मध्ये व्हीडीओ ग्राफी व फोटो ग्राफी घेवुन अपलोड करण्यात आली आहे. सदर इसम हा धारदार लोखंडी चाकु बाळगुन कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे बेतात असल्याने लोखंडी चाकु ताब्यात घेवुन आरोपीसह पोस्टेला परत येवुन आरोपी याचे कृत्य कलम 4, 25 भा.ह.का कायदा अन्वये करण्यात आली.

हि कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री सौरभ अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशीव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील महाडिक , यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री नागेशकुमार चतरकर यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील PSI शरद गायकवाड,PSI सुनील राम,HC महेद्र पाटील,HC अभिजीत वाघमारे,PC रंजीत भुरसे, PC अमोल साळवन, PC प्रवीण मून यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये