ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट येथे वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; नियमभंग करणाऱ्या १७० वाहनचालकांवर कारवाई

मिशन झिरो अॅक्सिडेंट अंतर्गत जनजागृती व कारवाई; वाहतूक नियमांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचा प्रवास सुरक्षित करण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे ‘मिशन झिरो अॅक्सिडेंट’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी हिंगणघाट येथे विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण १७० वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात आली. वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार घुले व वाहतूक अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

या मोहिमेदरम्यान वाहनचालकांना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, वाहनांची आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास न देणे, तसेच वाहन चालविताना वेगमर्यादेचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय सार्वजनिक रस्त्यांवर किंवा नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी न करणे, रुग्णवाहिका व आपत्कालीन वाहनांना मार्ग मोकळा करून देणे आणि वाहतुकीची शिस्त राखण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

ही मोहीम केवळ दंडात्मक कारवाईपुरती मर्यादित नसून, रस्ते अपघातांना प्रतिबंध घालणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि वाहतूक शिस्त निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांकडून विनापरवाना वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात रोखण्यावरही भर देण्यात येत आहे.

‘वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात टाळा आणि सुरक्षित प्रवास करा,’ असे आवाहन वर्धा जिल्हा वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

— विजयकुमार घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक,वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये