ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कापूस किसान नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा,कापूस विक्रीसाठी नोंदणी अनिवार्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ भारतीय कापूस निगम लिमिटेडच्या (सीसीआय) हमीभाव केंद्रावर कापूस विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कापूस किसान ॲपद्वारे नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरवरून वाढवून आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आणखी दोन महिन्यांची संधी उपलब्ध झाली आहे.

कापूस हंगाम २०२६-२७ मध्ये सीसीआयकडे हमीभावाने कापूस विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी कापूस किसान मोबाईल ॲप डाउनलोड करून स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी नोंदणीसाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

नोंदणी करताना शेतकऱ्यांनी चालू हंगामातील कापूस पिकाचा पेरा नमूद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आणि स्वतःचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात अपलोड करताना त्यावरील माहिती अचूक असल्याची खात्री करावी. अशी माहिती सभापती इंद्रपाल धुडसे व सचिव अनिल चौधरी यांनी केली आहे.

ॲपवर नोंदणी करताना तांत्रिक अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा. एकही पात्र कापूस उत्पादक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहू नये, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता मुदतीपूर्वी नोंदणी पूर्ण करावी.

*इंद्रपाल धुडसे,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये