खिर्डी येथे महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स चे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर खिर्डी या गावी दिनांक 8 मार्च ते 14 मार्च 2026 या दरम्यान यशस्वीरित्या संपन्न झाले. दिनांक 9 मार्च रोजी या शिबिराचे उद्घाटन डॉ. अनिल चिताडे ,प्राचार्य ,राजीव गांधी अभियांत्रिकी व संशोधन संस्था चंद्रपूर तथा संचालक,गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री विठ्ठलरावजी थिपे, उपाध्यक्ष गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर उपस्थित होते , या सोहळ्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक गण तसेच ग्रामपंचायत च्या सर्व सदस्यांनी व विशेष करून उपसरपंच श्री दीपक खेकारे यांचे मोलाचे सहकार्य या शिबिरासाठी लाभले. सात दिवसात चालणाऱ्या या शिबिरामध्ये दररोज सकाळी ग्राम विकासासाठी कुठला कुठला नवीन उपक्रम दुपारी बौद्धिक मार्गदर्शन व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन असा नित्यक्रम ठरला असल्यामुळे एकंदरीत ग्रामवासियांचे व शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे मनोरंजन
तसेच त्यांच्या कलागुणांना विशेष वाव या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेला आहे.
सकाळच्या ग्राम विकासाच्या दृष्टीने नवीन उपक्रमामध्ये ग्रामस्वच्छता ग्रामीण जीवनातील निरामय आरोग्य राखण्यासाठी आरोग्य शिबिरे गावातील जनावरांच्या आरोग्य संदर्भात पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन तसेच रोगराई गावामध्ये पसरू नये या संदर्भात गावातील तरुणांना व्यसना संदर्भात मार्गदर्शन व गावातील विविध प्रकारचे सर्वेक्षण असा नित्यक्रम दररोज सकाळी सात ते दहा च्या दरम्यान राबविण्यात आला.तसेच डॉ. बद्रे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ्यांचे सिकलसेल परीक्षण करण्यात आले.
दुपारच्या बौद्धिक सत्रमध्ये त्यांना वेगवेगळ्या तज्ञ व्यक्ती तर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये आरोग्य शिक्षण,योग विद्या, निरक्षरता,स्त्री शिक्षण यासंदर्भात बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या बौद्धिक क्षेत्रासाठी सेवानिवृत्त प्राचार्या. सौ स्मिता चिताडे , डॉ. विशाल मालेकर आणि डॉ. शरद बेलोरकर,डॉ. पवन नाईक, मा. संजीव गौंड व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, डॉ. स्वप्नील गुडघे खत्री महाविद्यालय तुकूम इत्यादी तज्ञ व्यक्तींना पाचारण करण्यात आले होते.
सायंकाळच्या सांस्कृतिक रजनी कार्यक्रमांमध्ये गावातील लहान लहान विद्यार्थ्यांमध्ये असणारे कला गुण तसेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थी प्रशिक्षण घेणारे स्वयंसेवक यांच्यातील कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी पाच ते नऊ या दरम्यान आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये नृत्य स्पर्धा, एकांकी नाटक तथा सामाजिक विषयावरती समाज जागृती करणारे उपक्रम इत्यादींचा समावेश होत होता. दिनांक 12 मार्च वीर बाबुराव शेडमाके जयंती निमित्त गावातून गावकरी मंडळी व रा. से. यो. विध्यार्थी यांनी स्वच्छता संदेश देण्यासाठी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 13 मार्च 2026 रोज शुक्रवारला सायंकाळी चार वाजता या शिबिराचा समारोप करण्यात आला या समारोपीय कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून श्री धनंजय गोरे सचिव गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर यांची उपस्थिती विशेष होती तथा त्यांचे मार्गदर्शन व भाषण पण यावेळी झाले त्याचप्रमाणे श्री रामचंद्र सोनपितरे संचालक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,ग्रामपंचायत खिर्डी येथील उपसरपंच दीपक खेकारे इतर सदस्य तथा राकेश बूटुकले तंटामुक्त समिती खिर्डी हे विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी हजर होते या समारोपिय कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत तसेच ग्रामस्थान सोबत विशेष चर्चा करण्यात आली या कार्यक्रमासाठी खिर्डी येथील महाविद्यालयाचे कर्मचारी श्री शुभकांत शेरकी यांनी विशेष मेहनत घेऊन या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आयोजनाच्या कामात विशेष मदत केली.या शिबिराचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांच्या गतीशील व्यक्तिमत्त्वामुळे हा कार्यक्रम विशेष रूपाने आखण्यात आला.या शिबिराला . सलाम सरपंच ग्रामपंचायत खिर्डी, दीपक खेकारे उपसरपंच, आशा शेरकी सदस्य, गीता कुमरे, सदस्य ग्राम पंचायत खिर्डी, राकेश बोटपल्ले, अध्यक्ष तंटा मुक्ती समिती खिर्डी,कोटनाके ताई माजी सरपंच, तसेच मान. सर्व ग्रामपंचायत सदस्य,श्री पांडे सर व सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक,सुनीता ताई मांडवकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, राजाराम पोले, गट ग्राम पंचायत अधिकारी खिर्डी,तसेच सर्व ग्रामस्थ यांनी रा. से. यो. शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष मदत केली.
या शिबीरा साठी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर चे अध्यक्ष माजी आमदार श्री सुभाष भाऊ धोटे, व सर्व मान. संचालक मंडळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन डॉ मनोहर बांदरे यांनी केले तर व आभार प्रदर्शन प्रा. चेतन वानखेडे समन्वयक यांनी केले. शिबीर यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर वृंद, विध्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली.



