ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. कैलास नागरे यांना अभिवादन ; पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र शासन कृषी विभाग पुरस्कारप्राप्त स्वर्गीय प्रा. कै. कैलास अर्जुन नागरे यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवार दि. १३ मार्च रोजी शिवणी आरमाळ येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला परिसरातील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करताना कैलास नागरे यांनी दिलेल्या बलिदानाला एक वर्ष पूर्ण झाले असतानाही त्यांच्या मागण्यांवर आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पोहरे यांनी स्पष्ट मत व्यक्त करत सांगितले की, नागरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा विधानसभेत मुख्यमंत्री यांनी केली होती; मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. त्यामुळे शासनाच्या आश्वासनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्यावरही त्यांनी थेट सवाल उपस्थित केला. “मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी लढताना प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी आमदारांनी पुढाकार घेतला का? त्यांच्या न्यायासाठी शासनदरबारी पाठपुरावा का झाला नाही?” असा सवाल उपस्थित करत स्थानिक आमदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावरही त्यांनी टीका केली. “जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने न्याय मिळवून द्यायला हवा होता. मात्र एक वर्ष उलटूनही ठोस निर्णय न होणे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नसल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

शोकसभेत बोलताना ॲड. अविनाश काळे यांनीही सरकारवर टीका केली. “हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नसून संपूर्ण शेतकरी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. स्वर्गीय कैलास नागरे हे शेतकऱ्यांसाठी लढताना शहीद झाले. त्यांचा सन्मान शासनाने करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

त्यांनी सरकारला इशारा देत सांगितले की, शासनाने तात्काळ २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली नाही, तर या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल आणि स्वतः ही केस लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 व डॉ. उपज देशमुख महिला जिल्हा अध्यक्ष अकोला किसान ब्रिगेड यांनी यावेळी ही प्रतिक्रिया व्यक्त केली

“फक्त शाळेची फी भरणे ही मदत देण्याची योग्य पद्धत नाही,” असा संताप व्यक्त करत त्यांनी सरकारच्या उदासीनतेवर टीका केली.

शोकसभेत उपस्थित माझी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंडे शिवनी व तसेच इतर गावातील शेतकरी माजी सरपंच सुनील आरमाळ व सरपंच सोनपासारे. व इतर बरेचसे मंडळी हजर होते यामध्ये पत्रकार . सुषमा राऊत.खंडू मांन्टे, सोसे ., नंदकिशोर देशमुख भीमराव चाटे व तसेच महिला व पुरुष शेतकऱ्यांनीही सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये