ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आळंद येथे विजेचा तार तुटलेला असल्याने शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
विद्युत तारांच्या स्पर्शाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली,अश्रुबा ज्ञानबा घुले रा. खापरखेडा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा वय 55 हे गेल्या पाच-सात वर्षापासून आळंद येथे आले होते आपल्या पाहुण्याकडे राहत असताना त्यांनी आळंद येथील जमीन ठोका बटयीने केली होती आज सकाळी ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता शेतामध्ये वरून गेलेला विज प्रवाहाची तार शेतामध्ये तुटून पडलेली होती त्याला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला सदर घटना आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान आळंद फाटा गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये घडली
याबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे



