कोरपणा येथील दुबारा मतदान असलेली नावे वगळण्याची प्रक्रिया सुरु

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा :_ नगरपंचायत क्षेत्रात मतदान क्रमांक 56,57,58 व 59 असून या मतदान यादीत एकूण 241 मतदार हे दुबारा नोद झाली आहे. सदर दुबारा मतदार कोरपणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी मतदान यादीत नोंद असून त्यामुळे शहरातील सार्वत्रिक निवडणुकीवर विपरीत परिणाम होत असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या. बरेच मतदार हे दुबारा मतदानाचा हक्क बजावत आहे.
कोरपणा येथील मतदान यादीत 241 मतदार हे दुबारा असल्यामुळे ही मतदार यादी तहसील कार्यालंय,नगर पंचायत तसेंच नगर परिषद गडचांदूर या ठिकाणी नोटीस बोर्डावर माहिती साठी लावण्यात आली आहे तरी दुबारा असलेल्या मतदार यांनी आपला कडे असलेल्या पुूरावा तहसील कार्यालंय निवडणूक विभाग येथे सादर करावा अन्यता मतदान यादीतून नाव वगळण्यात येणार आहे करिता दुबारा यादीत मतदान असलेल्या मतदारानि मुदत पूर्व पुरावे सादर करण्याचे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार कोरपणा यांनी केले आहे.
या बाबत अधिक माहिती साठी तहसील कार्यालंय निवडणूक विभाग येथे संपर्क करावा.



