जबरीने पैसे हिसकावुन पळुन जाणाऱ्या अज्ञात आरोपी ताब्यात
एकुण ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करून गून्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सेलु येथे दिनांक २४/०२/२०२६ रोजी फिर्यादी नामे श्रीमती यासमीन जुनेद खॉन पठाण, वय २८ वर्षे, रा. वार्ड क. ०५ सेलु ता. सेलु जि. वर्धा यांनी येवुन तकार दिली कि, दि. २४/०२/२६ रोजी फिर्यादी यांचे घरी यातील अज्ञात आरोपी हा येवुन तुम्हाला रेती पाहीजे असेल तर ८,०००/- रु प्रमाणे मिळेल असे म्हटले असता फिर्यादीचे वडीलांनी आम्हाला रेती दाखवा तेव्हा अज्ञात आरोपीने फिर्यादीचे वडीलास आपले मोटर सायकलवर बसवुन घराचे काही दुर अंतरावर घेवुन गेला त्यांना गाडीचे पेट्रोल संपले आहे, तुम्ही ईथेच थांबा असे म्हणुन तेथुन निघुन फिर्यादीचे घरी एकटाच परत येवुन फिर्यादीस पोलीसांनी माझी गाडी पकडली आहे. त्यांना पैसे दयायचे आहे असे म्हणुन ८,०००/- रु मागीतले असता फिर्यादी ही तिचे जवळ असलेले ५०,०००/-रु चे बंड्डल घेवुन त्यातील पैसे काढुन देत असतांना अज्ञात आरोपीने फिर्यादीचे हातातील नगदी ५०,०००/- रु हे जबरीने हिसका मारुन पळुन गेला. त्याचा पाठलाग केला असता तो मिळुन न आल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन सेलु येथे अप क्रमांक १३७/२०२६ कलम ३१८(२), ३०४(२) भारतीय न्याय सहीता सन २०२३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
-सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन समांतर तपास करीत असतांना गोपनिय बातमीदार, तांत्रिक पध्दतीने तसेच अश्या प्रकारे गुन्हे करणारे रेकार्ड वरील सहाईत गुन्हेगारांबाबत बारकाईने तपास केला असता माहीती प्राप्त झाली कि, जिल्हा संभाजीनगर येथे राहणारा आरोपी नामे शेख फेरोज शेख अहमद, वय ५५ वर्षे, रा. नवा मोढा, मिसरवाडी, संभाजीनगर, ता. जि. संभाजीनगर यांनी केला असल्याबाबत निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेवुन तो वर्धा जिल्हयातील ऐळाकेळी परीसरात असल्याबाबत माहीती प्राप्त झाल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यांचे जवळुन गुन्हयातील फसवणुक करुन जबरीने हिसकावुन नेलेल्या रक्कमेपैकी १) नगदी २०,०००/-रु, २) एक गुन्हा करते वेळी वापरलेली होन्डा कंम्पनीची विना क्रमांकाची शईन मोटर सायकल किंमत ५०,०००/- रु ३) एक विवो कंम्पनीचा अॅन्ड्रॉईड मोबा. कि. १०,०००/-रू, असा एकुण ८०,०००/- रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन सेलु यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार, सचिन इंगोले, चंदकांत बुरंगे, भुषन निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविंद ईगोले, राहुल अधवाल, दिनेश बोथकर सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.


