शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीचा विद्यार्थी आंतर-क्षेत्रीय स्पर्धेत प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी : आयईडीएसएसए अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन, पुणे यांच्या वतीने पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंतर-क्षेत्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन, ब्रम्हपुरी येथील विद्यार्थी रोहित ढबले यांनी १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत संस्थेचा मान उंचावला. या उल्लेखनीय यशासाठी विद्यार्थ्याला क्रीडा प्रशिक्षक श्री. राकेश देवघरे, क्रीडा व्यवस्थापक प्रा. संघर्ष पिल्लेवान तसेच क्रीडा प्रभारी अधिकारी प्रा. धनंजय पारधी यांचे मार्गदर्शन लाभले.
रोहितच्या या यशाबद्दल संस्थेचे प्र. प्राचार्य डॉ. राजन वानखडे, कार्यालय अधीक्षक श्री. कपिल मेश्राम तसेच श्री. विष्णू वैद्य यांनी अभिनंदन करून त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ही कामगिरी संस्थेसाठी अभिमानास्पद ठरली असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रती प्रेरणा निर्माण करणारी आहे.


