दोन्ही ऊद्योगात स्थानीक बेरोजगारांनाच प्राधान्य : ना. फडणवीस
भद्रावती येथे न्यु ईरा व ग्रेटा कंपण्यांच्या प्रकल्पांचे भुमीपुजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे
भद्रावती शहरालगत असलेल्या तेलवासा परीसरात न्यु ईरा व ग्रेटा कंफण्यांचे प्रकल्प आलेले आहेत.या दोन्ही प्रकल्पात स्थानीक बेरोजगारांनाच प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.परीसरात न्यु ईरा व ग्रेटा या कंपण्यांच्या प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी, मंत्री आशीष जयस्वाल, पालकमंत्री ऊईके,खा.प्रतिभाताई धानोरकर, आ.करण देवतळे,आ.किशोर जोरगेवार,हंसराज अहीर तथा न्यु ईरा व ग्रेटा कंफण्यांचे अधिकारी उपस्थित होते. न्यु ईरा कंपणीतर्फे कोळशापासून गैस इंधन तथा ग्रेटा कंपणीतर्फे हरीत लोहनिर्मिती केल्या जाणार आहे.या क्षेत्रातील उत्पादन मोठ्या प्रमाणात देशात आयात करण्यात येत असल्याने देशाचे मोठे परकीय चलन खर्च होत आहे.मात्र येथील उत्पादन सुरु झाल्यानंतर काही प्रमाणात परकीय चलनाची बचत होऊ शकेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.हे दोन्ही ऊद्योग येत्या दिड ते दोन वर्षात सुरु होईल.या उद्योगांमुळे भद्रावती परीसराचा कायापालट होऊन अनेकांना प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष रोजगार ऊपलब्ध होऊन त्यांचे जिवनमान ऊंचावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या दोन्ही ऊद्योग ऊभारणीत कोणताही अडथळा येणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दोन्ही ऊद्योगांना दिली.केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी हे दोन्ही ऊद्योग हे स्वयं पुर्ण भारत या मोहिमेतील महत्वाचे पाऊल असल्याचे सांगुन येत्या काळात हा संपूर्ण परीसर हा गैसीफीकेशन हब होईल असा विश्वास व्यक्त केला.मंत्रोपचारात पारंपारीक पध्दतीने दोन्ही ऊद्योगांचे रीतसर भुमीपुजन पार पडले.दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी या प्रकल्पांचे काम नियोजीत वेळेत पुर्ण होऊन प्रत्यक्ष ऊत्पादनाला सुरुवात होईल असा विश्वास व्यक्त केला.विशेष म्हणजे हे दोन्ही प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याने परीसरातील प्रदुषणावर आळा बसेल .सदर भुमीपुजनाच्या कार्यक्रमाला परीसरातील नागरीक व प्रकल्पग्रस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



