ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हंसराज अहीर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करा!

कार्यक्रम व बॅनर टाळण्याचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- दि. 11 नोव्हेंबर 2026 रोजी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहीर यांचा वाढदिवस आहे. मात्र, यावर्षी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी बांधवांवर ओढवलेले संकट लक्षात घेता वाढदिवसाचे कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

          राज्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला असून शेतकरी बांधव विविध अडचणींचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत समाजातील आर्थिक व नैसर्गिक संकटांची जाणीव ठेवून सामाजिक संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त भावनेपोटी बॅनर व होर्डिंग्ज लावणे टाळावे.

          वाढदिवस हा केवळ उत्सव न राहता समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी व्यक्त करण्याची संधी ठरावी. अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत साधेपणाने वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांचे कार्यालयातून पत्रकाद्वारे सुचित करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये