ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून युवा सेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी पाटील कुहिरे यांच्याकडून ४१ हजारांची मदत.

स्व.अनंता घोंगे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात; सामाजिक बांधिलकीचे घडविले दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 आयुष्यभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे तसेच गावासाठी आणि समाजासाठी नेहमी धडपडणारे स्व. अनंता सदाशिव घोंगे यांचे दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी सोमवारी सकाळी ११.३० वाजता विजेच्या धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने घोंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या कुटुंबाला आधाराची गरज असताना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी पाटील कुहिरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून स्व. अनंता घोंगे यांच्या कुटुंबाला ४१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

स्व. अनंता घोंगे हे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांप्रदायिक क्षेत्रात अग्रेसर होते. तसेच ते युवा सेना तालुका उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. अशा कठीण प्रसंगी शिवाजी पाटील कुहिरे यांनी मदतीचा हात पुढे करून माणुसकीचे अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

मित्राच्या कुटुंबाला उघड्यावर पडू देणार नाही!

वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च न करता गरजू कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा शिवाजी पाटील कुहिरे यांचा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. वाढदिवस केवळ केक कापून किंवा अनावश्यक खर्च करून साजरा करण्यापेक्षा गरजू कुटुंबाच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हीच खरी माणुसकी असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.

माणुसकी हीच खरी संपत्ती, हे शिवाजी पाटील कुहिरे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये