ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवाळीच्या दिवशी शिवसेना नेते मुकेश जिवतोडे यांना अटक!

पोलिस राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा जिवतोडे यांचा आरोप : अटकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :_ स्थानिक बेरोजगार, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी वेकोली प्रशासनाविरोधात करण्यात आलेल्या त्रिशूल आंदोलनाप्रकरणी शिवसेना नेते मुकेश जिवतोडे यांना घुग्घुस पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सणादरम्यान झालेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चेला सुरुवात झाली आहे.

त्रिशूल आंदोलनानंतर विधानपरिषद आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून आवाजाचे नमुने देण्यासाठी पोलिसांनी संबंधितांना पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याची सूचना केली होती. मात्र, दिवाळीचा सण लक्षात घेता दिवाळीनंतर उपस्थित राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती मुकेश जिवतोडे यांनी पत्राद्वारे पोलिस प्रशासनाकडे केली होती.

असे असतानाही दिवाळीच्या दिवशी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अटक केली. यावेळी त्यांची बहीण भाऊबीजेसाठी घरी आलेली असताना ही कारवाई झाल्याचे जिवतोडे यांनी सांगितले.

या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करताना जिवतोडे यांनी पोलिस प्रशासनावर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. आम्ही सत्तेत असतानाही प्रशासनाकडून आमच्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. सर्वसामान्य बेरोजगार, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे हा काय गुन्हा आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, दिवाळीच्या सणादिवशी झालेल्या या अटकेमुळे घुग्घुससह चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये