ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निळकंठराव शिंदे महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन तायक्वांडो स्पर्धा व निवड चाचणी संपन्न : विजयी खेळाडूंचा गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथे गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन तायक्वांडो स्पर्धा आणि निवड चाचणी नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांच्या १४ मुले आणि १० मुली अशा एकूण २४ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.

         या स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सतीश खेमस्कर यांच्या मार्गदर्शनात पंच, रेफ्री, डॉक्टर आणि उद्घोषक (अनाउन्सर) यांची चमू उपस्थित होती. निवड समितीचे सदस्य डॉ. विशाल शिंदे आणि आदर्श महाविद्यालय देसाईगंजचे क्रीडा संचालक श्री. राजेंद्र चावके सर यांच्या उपस्थितीत खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली. तसेच विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य (गोल्ड, सिल्वर, ब्रांझ) पदक देऊन गौरविण्यात आले.

८ वजन गटांतून मुले/मुली खेळाडूंची निवड

     या निवड चाचणीतून एकूण ८ वेगवेगळ्या वजन गटांमधील उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यासोबतच ‘पुमसे’ (Poomsae) प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक (Team Poomsae) खेळासाठी सुद्धा गुणवंत खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली.

*राष्ट्रीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी संघ रवाना*

निवड झालेले हे खेळाडू आगामी राष्ट्रीय स्तरावरील ‘ऑल इंडिया आंतर विद्यापीठ’ स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

• मुलांचा संघ: दिनांक ०१ ते ०५ डिसेंबर २०२६ या कालावधीत ‘ग्लोबल युनिव्हर्सिटी’, जयपूर (राजस्थान) येथे आयोजित भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.

• मुलींचा संघ: दिनांक २१ ते २४ डिसेंबर २०२६ दरम्यान ‘शारदा युनिव्हर्सिटी’, ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.

*खेळाडूंचा जाहीर गौरव व सत्कार*

      खेळाडूंनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल आणि राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल निळकंठराव शिंदे महाविद्यालयाच्या वतीने सर्व विजयी खेळाडूंचा नुकताच एक शानदार समारंभ आयोजित करून जाहीर गौरव करण्यात आला.

या प्रसंगी भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे आणि सहसचिव डॉ. विशाल शिंदे यांनी उपस्थित राहून खेळाडूंचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, उपप्राचार्य प्रा. डॉ. अजय दहेगावकर, प्रा. कुंदन सहारे, प्रा. नत्थू वाढवे, प्रा. प्रविणकुमार नासरे, प्रा. डॉ. शशिकांत शित्रे आणि प्रा. संदीप प्रधान प्रामुख्याने उपस्थित होते.

स्पर्धेच्या आणि सत्कार समारंभाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे कर्मचारी श्री. अजीज शेख, श्री. विशाल प्रसाद, श्री. सुरज दखणे, श्री. विशाल गौरकार, श्री. पांडुरंग आखतकर, श्री. प्रमोद तेलंग व श्री. बंडू पेंदोर यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये