ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सेवानिवृत्त शिक्षक शास्त्रीजी बळीराम घोणमोडे यांचे निधन
वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
चिमूर तालुक्यातील मोखाळा (नेरी) येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त शिक्षक शास्त्रीजी बळीराम घोणमोडे (वय ८६) यांचे रविवार, ९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर ९ नोव्हेंबर रोजी मोखाळा येथील उमा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.



