भाऊबीज दिन विशेष _ भावांबहिनींच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक भाऊबीज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भाऊबीज हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला दिवाळी सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीयेला- दिवाळीचा सहावा दिवस साजरा केला जातो. या सणाला ”यमद्वितीया” असेही म्हणतात.
*भाऊबीजेची पौराणिक कथा*
*यम आणि यमुना*
पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान यमराज आपली बहीण यमुना हिच्या आमंत्रणावरून तिच्या घरी जेवायला गेले होते, यमुनेने आपल्या भावाचा आदरतिथ्य सत्कार करून त्याला ओवाळले. यामुळे प्रसन्न होऊन यमराजाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा यमुनेने मागितले की, “आजच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी भोजन करेल आणि बहीण भावाला ओवाळेल, त्याला यमभय असू नये”. तेव्हापासून ही परंपरा शुरू झाली.
*भाऊबीज साजरी करण्याची पद्धत*
गोडधोड भोजन : विवाहित बहिणी आपल्या भावाला आदराने आपल्या घरी किंवा भाऊ बहिणीच्या घरी जातो, आणि गोडधोड जेवण करतात.
औक्षण: बहीण भावाच्या कपाळावर कुंकू-अक्षता लावून निरंजन किंवा दिव्याने ओवाळते.
दीर्घायुष्याची प्रार्थना : बहीण भावाच्या दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी देवाला प्रार्थना करते.
ओवाळणी- भेटवस्तू : औक्षण झाल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला प्रेमळ भेटवस्तू, वस्त्रे किंवा ओवाळणी देतो.
विशेष : जर एखाद्या बहिणीला भाऊ नसेल, तर ती चंद्रकोरीची पूजा करून चांदोबाला ओवाळते.
भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया- यमद्वितीया या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.
या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात ”ओवाळणी” देऊन बहिणीचा सत्कार करतो. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकेची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे, म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची.
या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची महानता- विशालता यावरून दिसून येते.



