ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरधाव दुचाकीची दुकानाला भीषण धडक, आक्सापूर बसस्थानकवरील घटना

एकाचा जागीच मृत्यू,दुसरा गंभीर जखमी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ कोठारीवरून दुचाकीने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीने आक्सापूर बसस्थानक परिसरातील घरा लगत असलेल्या दुकानाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीचालक प्रकाश पत्रु झाडे वय ३५ राळापेठ यांचा जागीच मृत्यू झाला, तर युगाल श्रावण गेडाम वय २७, रा. राळापेठ, ता. गोंडपिपरी हे गंभीर जखमी झाले.दुचाकी क्रमांक mh ३४ cp ०१४९ असून ही घटना दिनांक (८)रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश झाडे व युगाल गेडाम हे दुचाकीने कोठारीवरून गोंडपिपरीच्या दिशेने रालापेठ कडे जात होते. दरम्यान, आक्सापूर बसस्थानकावरील कालिदास गुंडावार यांच्या घरालगत असलेल्या दुकानाजवळ दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव दुचाकी थेट दुकानावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, त्या दुकानाचा काही भाग क्षतीग्रस्त झाला.

या अपघातात प्रकाश झाडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर युगाल गेडाम गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कोठारी पोलीस स्टेशन चे ठाणेदार दीपक कांक्रेडवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात रात्रीच्या वेळी घडल्याने परिसरात वर्दळ कमी होती.पुढील तपास कोठारी पोलीस करीत आहेत.

     अपघात झाल्यानंतर रुग्वाहिका १०८ या नंबर वर दुरध्वनी करण्यात आला.मात्र तब्बल एक तास यायला लागल्याने जखमी ला तोपर्यंत ताटकळत रहावे लागले असल्याची परिसरात चर्चा आहे.आणि हा सुरजागड लोहखनिज वाहून नेणारा वर्दळीचा मार्ग असून अपघात होऊ नये यासाठी वाहनावर नियंत्रण ठेवणारे चार चाकी वाहन अपघात होऊनही घटनास्थळी आले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये