ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मेहुणा राजा येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न 

69 दाखले व प्रमाणपत्रचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजस्व मंडळ मेहुना राजा तालुका देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र शासनाचा लोकाभिमुख उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आले. सदर शिबीराला अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला, राजस्व मंडळ मेहुणा राजा अंतर्गत 14 गावांमधील शेतकरी कास्तकार तसेच सरपंच पोलीस पाटील या शिबिरामध्ये बहुसंख्येने उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ उपस्थित होत्या . व्यासपीठावर नायब तहसीलदार सायली जाधव,उपाध्यक्ष भूमी अभिलेख खेडेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी वायळ, सीडीपिओ मुंढे मॅडम, मंडळाधिकारी मेहुणा राजा विजय हिरवे, पंढरी जायभाये,रामदास मांटे, विनोद डोईफोडे,तथा ग्राम महसूल अधिकारी संजय हंडे, तांबे , पी डी बुरकुल,जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जायभाये व म्हस्के सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक व महसूल सेवक उपस्थित होते.

शिबिरामध्ये एकूण 69 विविध प्रकारचे दाखले तथा प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले .तसेच विविध प्रकारच्या शासकीय निर्णय, योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन महसूल सेवक शरद काकडे यांनी केले. प्रास्ताविक महसूल मंडळ अधिकारी श्री विजय हिरवे यांनी केले.त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध सामाजिक विषय

व्यसन मुक्ती, संत चोखा मेळा यांचे चरित्र दर्शन यावर सदाबहार सांस्कृतिक कार्यक्रम झाले.त्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय तहसीलदार यांनी राजस्व अभियान पाठीमागे शासनाची भूमिका तसेच शिबिराचा उद्देश विशद केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी श्री हांडे यांनी केले.या अभियानामध्ये रस्त्याच्या कामाबाबत सात अर्ज प्राप्त झाले.

तसेच उपलब्ध उपस्थित शेतकरी बांधवांचे आरोग्य तपासणी त्यामध्ये मधुमेह तपासणी करण्यात आली. सदर शिबिराला माननीय निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुरेश कव्हळे साहेब यांनी भेट दिली तसेच विविध विभागाचे स्टॉल्सची पाहणी केली सूचना केल्या व मार्गदर्शनही केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये