जामरैयतवारी येथे महिलांचा मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न आरोग्य शिबिर,सत्कार कार्यक्रम
रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- तालुक्यातील जाम रैयतवारी येथे बंडूभाऊ बुरांडे मित्रपरिवार व त्रिवेणी महिला ग्रामसंघ जामखुर्द यांच्या वतीने महिला मेळावा,विविध योजना संबंधित शिबिर,आरोग्य शिबीर व सत्कार सोहळा दि.२५ जानेवारीला जामरैयतवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, प्रमुख उपस्थिती माजी सरपंच बंडू बुरांडे,भाजप तालुका अध्यक्ष हरिष ढवस,कृ.उ.बा.स.चे संचालक रवी गेडाम,माजी उपसभापती ज्योती बुरांडे,माजी उपसभापती विनोद देशमुख,वैशाली बोलमवार,पपीता पोलवार,मधुकर टिकले,ईश्वर नैताम,अजय मस्के, सुरेंद्र चिडे,प्रणय गरमडे,सुभाष तेलमासरे,धनलाल भोयर,बंडू बारसागडे यांची उपस्थिती होती.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात महिलांचा हळदी-कुंकू देऊन सन्मान करण्यात आला.यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या विधवा महिलांना पैठणी देऊन गौरविण्यात आले.सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांचा सामाजिक,आर्थिक व राजकीय सहभाग वाढवणे व सक्षमीकरणासाठी संघटनात्मक चळवळ वाढवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू बुरांडे, संचालन एकता बंडावार यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजीत गेडाम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडू बुरांडे मित्रपरिवार व त्रिवेणी महिला ग्रामसंघ जामखुर्दचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनींनी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



