राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाचे साधन आहे – प्राचार्य डाॅ. ए.चंद्रमौली
रा. म.गां.महाविद्यालया द्वारे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रपिता महात्मा गांधी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली तथा ग्रामपंचायत कवठी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठी येथे दिनांक 27 जानेवारी 2026 ते 02 फेब्रुवारी 2026 पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. कवठी ग्रामपंचायतचे सरपंच सौ. कांताबाई बोरकुटे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेल्या या क्रार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. ए.चंद्रमौली हे अध्यक्ष म्हणून होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॅ. ए. चंद्रमौली यांनी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून शिबिराथ्र्यांचे शारिरीक,मानसिक, बौध्दीक व सांस्कृतिक विकास होतो. विद्याथ्र्यांमध्ये आत्मविश्वास,अनुशासन, नियोजन, सामाजिक जीवन, व सामाजिक बांधीलकी वाढून विद्याथ्र्यांचा सर्वागिण विकास होतो.
या उद्घाटनप्रसंगी मंचावर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री राकेशजी घोटेकर, जि.प.प्राथ.शाळा कवठीचे मुख्याध्यापक राजेंद्र नंदीग्रामवार, तंटामूक्ती समितीचे अध्यक्ष बंडूजी बोरकुटे, आदर्श शेतकरी लोमेश भोयर, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डाॅ. राम वासेकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. देविलाल वताखेरे, डाॅ. राजश्री मार्कंडेवार, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला दुदैवी अपघातात मृत्यू झालेले महाराष्ट्राचे तडफदार उपमुख्यमंत्री आद. अजीतदादा पवार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय उत्कर्ष – राज्यस्तरीय कॅम्प व आव्हान – आपत्तीव्यवस्थापन यात सहभागी झालेले विद्यार्थी अंकुश सोनुले, लखन मेश्राम, प्रिया चरडूके व पृथ्वीक निकुरे या विद्याथ्र्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.देविलाल वताखेरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रासेयो स्वयंसेवक अंकुश सोनुले तर आभार प्रदर्शन रासेयो स्वयंसेविका प्रिया चरडूके हिने मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद, गावकरी मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.



