ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गौवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई

एकूण 36 गौवंशांना जीवनदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 27 जानेवारी रोजी तरोडा फाटा येथे गौवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली.

गौवंश तस्करीची माहिती पोलिस कंट्रोल रूमला तात्काळ माहिती देण्यात आली.

गौ रक्षा हिंदू दल महाराष्ट्र यांच्या वतीने, श्री. राम नंदनवार (प्राणी कल्याण अधिकारी) यांच्या उपस्थितीत तसेच खरांगना पोलीस स्टेशन यांच्या मदतीने 9 बोलेरो पिकअप वाहनांवर कारवाई करत एकूण 36 गौवंशांना जीवनदान देण्यात आले.

या कारवाईत वाचविण्यात आलेल्या सर्व गौवंशांना पुढील उपचार व देखरेखीकरिता राधा कृष्ण गौशाला, नालवाडी, वर्धा येथे सुरक्षितरित्या पाठविण्यात आले आहे.

पोलिस प्रशासन व सर्व गौ रक्षकांचे मनःपूर्वक आभार

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये