सरदार पटेल महाविद्यालयाच्या करिअर कट्टा अंतर्गत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
डॉ. पी. एम.काटकर यांना उत्कृष्ट प्राचार्यांचा प्रथम पुरस्कार
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम .काटकर यांना उत्कृष्ट प्राचार्यांचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता यांचे संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा ‘उपक्रम राबविला जात आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर यांच्या मार्गदर्शनात सदर ‘करिअर कट्टा’ उपक्रम महाविद्यालयात घेतला जात आहे. त्याच अंतर्गत घेण्यात आलेल्या २०२४-२५ सत्रात राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयास ‘बी’ ग्रेड सह ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चा दर्जा मिळाला होता. त्यामुळे ‘करिअर कट्टा’ कडून दिल्या जाणाऱ्या अनुदाना अंतर्गत महाविद्यालयास साधनसामग्री प्राप्त झालेली होती. दरम्यान यंदा याच उपक्रमांतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम .काटकर यांना चंद्रपूर जिल्हास्तरीय उत्कृष्ट प्राचार्यांचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,करिअर कट्टा’ ची चमू व सतत सहयोग देणारे सर्वोदय शिक्षण मंडळ यांच्या सामूहिक प्रयत्नांची ही फलश्रुती असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी व्यक्त केले. त्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, एस.रमजान सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्यासह या उपक्रमाचे समन्वयक प्रा. संदेश पाथर्डे व डॉ. प्रकाश बोरकर यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



