शांताराम पोटदुखे विधी महाविद्यलयात 77 वा गणराज्य दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
चंद्रपुर :_ स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय येथे 26 जानेवारी २०२६रोजी, भारताच्या गणतांत्रिक व्यवस्थे ला 77वर्षे पूर्ण झाल्या च्या निमित्ताने गणराज्य दिन आनंदाने साजरा करण्यात आला. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी महाविद्यालयातील कर्मचारी श्री राजू काकडे यांच्या यावर्षी सेवानिवृत्ती असल्यामुळे त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण महाविद्यलयात करण्यात आले. या प्रसंगी पदवीत्तर विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंकज काकडे,पदवी विभाग प्रमुख डॉ. अभय बुटले, डॉक्टर मनीषा आवळे डॉक्टर कार, रा. से. यो. प्रमुख नंदकिशोर भंडारी तसेच सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. महाविद्यालया चे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी कार्यक्रमा च्या आयोजना साठी अथक परिश्रम घेतले.
या प्रसंगी विधी महाविद्यालयात ध्वजारोहण आणि ध्वज वंदनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी सर्वाना गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्या आणि आज च्या तरुण पिढी ने भारत एक मोठी लोकशाही असलेला देश म्हणून त्याची एकता आणि अखंडता प्रस्थापीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असण्याचे आवाहन केले.विधी महाविद्यालयात विद्यार्थिनीने सुंदर रांगोळी व रंगीत पताका लावून महाविद्यालयीन परिसर सुशोभीत करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.



