ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू पिवुन वाहन चालविणाऱ्या चालकांवर कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 14/03/2026 व दि 15/03/2026 रोजी वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथील 1 व 2 या दोन्ही मार्शल अंमलदार यांनी मा. पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार पोहवा शब्बीर सैयद ब.क 814, सफौ अनिल तिवारी ब.क. 443, पोशि दिलीप कामडी 163, पोहवा आंबेडकर चौक, तसेच अंबीका चौक येथे रोडवर पेट्रोलींग करून वाहने चेकींग केली असतांना सदर वाहन क MH AY 2551 चा चालक आपले वाहने निष्काळजीपणे झिंगझेंग पध्दतीने चालवितांना मिळुन आल्याने सदर वाहन चालक नामे 1) संजय भाऊराव येरचे वय 45 वर्ष रा. हवलदारपुरा वर्धा तसेच गाडी क MH 31 BU 1688 चा वाहन चालक नामे मनोज किशोरराव गडवार वय 40 वर्ष रा वर्धा हे दोघेही दारू पिवुन असल्याचा संशय आल्याने सदर वाहन चालकास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथे आणुन त्यांचे ब्रिथ अॅनालाईझर ने दारू पिवुन असल्याचे चेक केले असता त्यांचे रक्ता मध्ये 396.8 एमजी अल्कहोलचे प्रमाण मिळुन आले त्यांचेवर 185 मोवाका अन्वये पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सदरचे वाहन हे वर्धा श येथे जमा करण्यात आले.

पो.नी. विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी दारू पिवुन वाहन चालवु नये असे सर्वाना नागरीकांना आव्हान केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये