ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शैक्षणिक सहलीतून घेतला निसर्गाचा ऐतिहासिक व भौगोलिक अभ्यास

जिल्हा परिषद प्राथ. (मुले) शाळेच्या विद्यार्थ्यांची कुलथा देवस्थानला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

   जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (मुले)गोंडपिपरी येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल अलीकडे कुलथा येथील प्राचीन हनुमान मंदिर देवस्थान येथे आयोजित करण्यात आली. वैनगंगा व अंधारी नद्यांच्या प्रवाहांनी वेढलेल्या बेटासारख्या भूभागावर वसलेल्या या गावाला विद्यार्थ्यांनी भेट देऊन निसर्गातील इतिहास आणि भूगोलाचा प्रत्यक्ष अभ्यास केला. सहल दरम्यान विद्यार्थ्यांनी मंदिर परिसराचा अभ्यास करत त्या ठिकाणचा ऐतिहासिक वारसा जाणून घेतला. तसेच दोन नद्यांच्या संगम परिसरात वसलेल्या गावाची भौगोलिक रचना, नदीकिनाऱ्यावरील वाळूची संरचना, पाण्याचा प्रवाह आणि परिसरातील नैसर्गिक वैशिष्ट्ये यांचे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण केले. विशेषतः सतत वाहणाऱ्या वैनगंगा नदी काठावर विद्यार्थ्यांनी निसर्ग निरीक्षण करून भूगोल व पर्यावरणाचा अभ्यास केला.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका दुष्यलता माऊलीकर, गोंडपिपरी केंद्राचे केंद्रप्रमुख अरूण झगडकर, सह शिक्षिका कुसुम भांडेकर व प्रांजली बावणे उपस्थित होते.

या शैक्षणिक अभ्यासपूर्ण सहलीदरम्यान इतिहास अभ्यासक म्हणून अरूण झगडकर यांनी परिसरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी, नद्यांनी वेढलेल्या भूभागाची वैशिष्ट्ये आणि कुलथा देवस्थानाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विषयांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. निसर्ग, इतिहास आणि भूगोल यांचा संगम घडवून आणणारी ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक व संस्मरणीय ठरली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये